Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा आदित्य नारायण कटरीना कैफसाठी बेली डान्स करतो तेव्हा......

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:12 IST

‘सा रे ग म प’ कार्यक्रमात या तिन्ही कलाकारांनी स्पर्धकांवर स्तुतिसुमने उधळली, त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांना ‘झीरो’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग आणि किस्से ऐकविले.

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गाण्याच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमातील सर्व स्पर्धक आपली सर्वोत्तम परफॉर्मन्सने रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. परीक्षकांवर आपली छाप पाडण्यासाठी हे स्पर्धक आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करीत आहेत. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान प्राप्त करण्यासाठी अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता आपल्या आपल्या ‘झीरो’ या आगामी  सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मासह ‘सा रे ग म प’च्या सेटवर उपस्थिती लावली होती. 

या भागाचा प्रारंभ दणक्यात झाला. सर्वच सपर्धकांनी अप्रतिम आवाजात आपली गाणी सादर केली आणि प्रेक्षकच नव्हे, तर परीक्षक आणि सेलिब्रिटींनाही मंत्रमुग्ध करून सोडले. या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक आदित्य नारायणने सांगितले की कटरिना कैफला आपल्यासोबत बाहेर जेवायला घेऊन जाण्याचे त्याचे स्वप्न आहे.  हे ऐकताच कटरिनाचा आनंद द्विगुणित झाला होता. मात्र असे लगेच तिने हे स्विकारलेन नाही. स्वीकारण्यापूर्वी तिने त्याच्यापुढे एक अट घातली. तिने सांगितले की बाहेर जेवायला येण्यापूर्वी आदित्यने आपल्याला बेली डान्स करून दाखवला पाहिजे आणि त्या नृत्याला साजेसे कपडेही त्याने परिधान केले पाहिजेत. तिची ही विनंती आदित्यने तात्काळ मान्य केली आणि आपल्या कमरेभोवती एक स्कार्फ गुंडाळला आणि त्यावर एक पट्टा लावला. त्यानंतर त्याने अप्रतिम बेली नृत्य करून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले.

या कार्यक्रमात या तिन्ही कलाकारांनी स्पर्धकांवर स्तुतिसुमने उधळली, त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांना ‘झीरो’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग आणि किस्से ऐकविले. यावेळी परीक्षक शेखर रावजियानीबरोबर स्पर्धक रिचा शर्माने ‘जग सूना लागे’  हे गाणे गाऊन शाहरूखवर असलेली आपली प्रीत व्यक्त केली. ईशिताने गायलेल्या ‘तुझमें रब दिखता है’  या गाण्याने शाहरूख खूपच प्रभावित झाला. त्याने तिला सांगितले की परमेश्वर जेव्हा एखाद्याला सुरेल आवाजाची देणगी देतो, तेव्हा तो त्यात आपला स्वत:चा थोडा अंश घालत असतो. तुझ्या या गाण्यातून मला रबचे दर्शन घडले, असे शाहरूखने तिला सांगितले.‘सा रे ग म प’च्या आगामी भागात प्रेक्षकांना या स्पर्धकांची अद्वितीय कामगिरी ऐकायला मिळेलच, पण ‘झीरो’ सिनेमाच्या प्रमुख कलाकारांनी केलेली धमालमस्तीने हा भाग अधिकच रंजक ठरला.

टॅग्स :आदित्य नारायणकतरिना कैफ