Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: "तिसऱ्याच दिवशी मला..."; घराबाहेर आल्यावर सोनाली राऊतचा तब्येतीविषयी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:28 IST

पहिल्या आठवड्यापासूनच सोनाली चांगली खेळत होती. परंतु अचानक तिला बाहेर पडावं लागत असल्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. परंतु घराबाहेर पडल्यानंतर सोनालीने तब्येतीविषयी खुलासा केला आहे.

सोनाली राऊत काल 'बिग बॉस मराठी ६' मधून एलिमिनेट झाली. या आठवड्यात नॉमिनेट असलेल्या ८ सदस्यांपैकी सोनालीला 'बिग बॉस मराठी ६'मधून घराबाहेर जावं लागलं. सोनालीचं एलिमिनेशन अनेकांसाठी धक्का देणारं होतं. इतकंच नव्हे पहिल्या आठवड्यापासूनच सोनाली चांगली खेळत होती. परंतु अचानक तिला बाहेर पडावं लागत असल्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. परंतु घराबाहेर पडल्यानंतर सोनालीने तब्येतीविषयी खुलासा केला आहे.

तिसऱ्या दिवशीच मला इन्फेक्शन झालंराजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सोनाली राऊत म्हणाली, ''मला वाटलं होतं मी फायनल पर्यंत पोहोचणारच आणि ट्रॉफी मला मिळणार. पण काय झालं तर माझ्या हेल्थवर आलं. माझ्या आरोग्याबाबत तडजोड झाली म्हणून मला शोमधून निघावं लागलं. मी जेव्हा घराच्या आतमध्ये गेली तेव्हा तिसऱ्याच दिवशी मला इन्फेक्शन झालं जे मी नोटिस केलेलं. दोन दिवस झाले तर ते थोडं वाढत गेलं. पहिलं ते माझ्या बट पासून सुरु झालेलं मग ते गुडघ्यापर्यंत गेलं. आणि मग ते हातावर पण आलं.''  ''तेव्हा मी पॅनिक मोडमध्ये होते. मग मी त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलले. ते सांगते होते, तुम्ही चांगलं खावा आणि चांगलं राहा. पण बिग बॉसच्या घरातच ते थोडंसं शक्य नव्हतं. आपण एकदम चांगलं राहणार आणि राहणार, कारण तो टास्कवर आधारीत शो आहे. मानसिक ताकदीचाही तो शो आहे. पण हेल्थसोबत तडजोड झाली आणि तिथे ते इन्फेक्शन सुरु झालं. मी डॉक्टरांना विचारलं पण डॉक्टरही काही करु शकत नव्हते. ते मला मेडिसिन देत होते पण ते नियंत्रणात येत नव्हतं त्यामुळे मला ते टीमला सांगावंच लागलं.'' अशाप्रकारे सोनालीने खुलासा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonali reveals real reason for leaving Bigg Boss Marathi 6

Web Summary : Sonali Raut eliminated from Bigg Boss Marathi 6 due to a worsening infection she contracted early in the show. Health concerns forced her exit.
टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस १९बिग बॉस मराठी ६रितेश देशमुखटिव्ही कलाकार