लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर सहा महिन्यात कमबॅक करणार आहे. मुलींच्या जन्माआधी ती एकता कपूरच्या 'कुंडली भाग्य' मालिकेत प्रीता या मुख्य भूमिकेत होती. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली होती. मात्र नंतर गरोदर असल्याने तिने मालिका सोडली होती. आता ती पुन्हा कमबॅक करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ती 'कुंडली भाग्य' नाही तर वेगळ्या मालिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री श्रद्धा आर्या 'कुंडली भाग्य' नाही तर 'कुमकुम भाग्य' मालिकेत दिसू शकते. 'टाइम्स नाउ'शी बोलताना श्रद्धा म्हणाली, "हो, मलाही भाग्य युनिव्हर्सची खूप आठवण येत होती. मी लवकरच कमबॅक करेन."
'कुंडली भाग्य'मध्ये साडेसात वर्ष प्रीताची भूमिका साकारल्यानंतर तिने मालिका सोडली होती. आता ती भाग्य युनिव्हर्समधील 'कुमकुम भाग्य' मालिकेतून कमबॅक करणार असल्याची शक्यता आहे. मालिकेच्या प्रोडक्शन टीमकडून सूत्रांना अशी माहिती मिळाली आहे. टीमने तिच्यासोबत चर्चा केली असून श्रद्धानेही होकार दिल्याचं बोललं जात आहे.
श्रद्धा आर्याने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. डिलिव्हरीनंतर ४ महिन्यांनी त्यांची नावंही रिव्हील केली आहेत. मुलाचं नाव शौर्य आणि मुलीचं सिया ठेवलं आहे. तिने मुलांचे घिबली आर्ट फोटो शेअर केले असून त्यांचा चेहरा मात्र रिव्हील केलेला नाही.