Join us

अभिनेत्री रिंकू धवन आणि यूट्यूबर अरुण महाशेट्टीची 'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 00:41 IST

अभिनेत्री रिंकू धवन आणि यूट्यूबर अरुण महाशेट्टीची 'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री झाली.

 'बिग बॉस १७' चं नवं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नवीन स्पर्धक, नवे नियम आणि नवीन घर यामुळे यावेळी बिग बॉस खूपच मजेशीर ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खान हा शो होस्ट करत आहे. सलमान खानने एकामागून एक सर्व स्पर्धकांचे स्वागत केलं. अभिनेत्री रिंकू धवन आणि यूट्यूबर अरुण महाशेट्टीची 'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री झाली.

रिंकू धवनला सोडण्यासाठी तिची आई मंचावर आली होती. रिंकू धवन गेल्या ३० वर्षांपासून टीव्हीवर सक्रिय आहे. तर हैदराबादी असलेला अरुण महाशेट्टी हा एक प्रसिद्ध युट्युबर आहे. दोघांचीही त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. दमदार असे स्पर्धक 'बिग बॉस 17' मध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या पर्वात ऑल इज वेल असणार की नसणार हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

'बिग बॉस 17' हा कार्यक्रम कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना कार्यक्रम पाहता येईल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. तसेच 24 तासांसाठी या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील जिओ सिनेमावर होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानबॉलिवूडटेलिव्हिजन