Join us

घटस्फोट, दुसरं लग्न अन् मिसकॅरेज; अभिनेत्रीने वयाच्या 35 व्या वर्षी दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:28 IST

पहिलं लग्न मोडल्यानंतर प्रियाचा प्रेमावरुन विश्वास उडाला होता. मात्र नंतर तिच्या आयुष्यात...

'बिग बॉस 9' (Bigg Boss 9) मध्ये सहभागी झालेली स्पर्धक प्रिया मलिकने (Priya Malik) गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्री, कवयित्री प्रिया मलिक सोशल मीडियावर तिच्या कवितांमुळे लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून ती प्रेग्नंसीमुळे चर्चेत होती. वयाच्या 35 व्या वर्षी ती आई झाली आहे. पहिलं लग्न मोडल्यानंतर प्रियाचा प्रेमावरुन विश्वास उडाला होता. मात्र नंतर तिच्या आयुष्यात करणची एन्ट्री झाली. आता दोघंही 'जोरावर' या गोंडस मुलाचे आई बाबा झाले आहेत.

प्रिया मलिक टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "मला आई होण्याची खूप इच्छा होती. मी एग्स फ्रीज करण्याचाही विचार केला होता. पहिल्या वेळी माझं मिसकॅरेज झालं. या दु:खातून सावरत आम्ही दुसरा चान्स घेतला आणि मी पुन्हा गरोदर राहिले. जोरावर च्या आमच्या आयुष्यात येण्याने आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे."

प्रिया मलिकने करणसोबत दुसरं लग्न केलं आहे. याआधी तिचा भूषण मलिकसोबत 2018 साली घटस्फोट झाला होता. यानंतर तिचा प्रेमावरुन विश्वासच उडाला होता. नंतर तिची भेट तिच्या अपार्टमेंटमध्येच वरच्या मजल्यावर राहणाऱ्या करणशी झाली. एक दिवस प्रिया आजारी पडली असताना करणने तिची काळजी घेतली होती. ती त्याला गंमतीत 'उपरवाला' असं म्हणायची. नंतर दोघांमध्ये हळूहळू ओळख वाढली आणि ते प्रेमात पडले. काहीच दिवसात त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2022 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकलं. आता त्यांच्या घरी पाळणा हलला असून मुलाच्या जन्माने दोघंही खूप खूश झाले आहेत.

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारप्रेग्नंसीसोशल मीडिया