Join us

अभिनेत्री कविता चौधरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, दूरदर्शनरील 'उडान' मालिका गाजवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:17 IST

उडान मालिकेतील आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या कविता चौधरी यांचं निधन

अभिनेत्री, निर्माती कविता चौधरी यांचं आज निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. अमृतसर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या धाकट्या बहीण होत्या. दूरदर्शनवरील 'उडान' मालिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका साकारली होती. त्यांनी आयपीएस डायरीज आणि युअर ऑनर हे दोन टेलिव्हिजन शोही बनवले होते. 

माध्यम रिपोर्टनुसार, आज १६ फेब्रुवारी रोजी अमृतसर येथील शिवपुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कविता या उत्तम अभिनेत्री आणि निर्मात्याही होत्या. शिवाय एका जाहिरातीतूनही त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला होता. १९८० साली आलेल्या सर्फच्या जाहिरातीतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. कविता यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.   

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूटेलिव्हिजन