Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुई गडकरीचं ठरलं तर मग! लग्न कधी करणार? विचारल्यावर अभिनेत्रीचं चाहतीला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:35 IST

जुई सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते

सर्वांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari)'ठरलं तर मग' मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. स्टार प्रवाहवरील ही मालिका टीआरपीमध्येही कायम टॉपवर असते. 'ठरलं तर मग' मधील सायली अर्जुनच्या कॉमेडी आणि रोमँटिक केमिस्ट्रीला पहिल्यांपासूनच प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, लपवाछपवी, नव्याने प्रेमात पडणं, कोर्ट ड्रामा हे सगळंच एकदम रंजक होतं. खऱ्या आयुष्यात जुई लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो. नुकतंच तिने एका चाहतीला उत्तर दिलं.

जुई सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते. नुकतंच तिने आस्क मी सेशन घेतलं त्यात तिला एकाने 'ताई, तुझं लग्न ठरलं का?' असं विचारलं. यावर यावर जुई हसतच उत्तर देत म्हणाली, 'ठरलं तर मग!'

मालिकेत पूर्णा आजींच्या भूमिकेत दिसणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यांच्या निधनाने जुईला मोठा धक्का बसला कारण तिने खरोखरंच त्यांना आजी मानलं होतं. सेटवर आजी नातीचं नातं खूप घट्ट होतं. पूर्णा आजीच्या निधनानंतर जुईने भावुक पोस्ट लिहिली होती. ज्योती चांदेकरांना जुईचं लग्न झालेलं बघायचं होतं. त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली असं जुईने लिहिलं होतं.

जुई गडकरी याआधी 'पुढचं पाऊल' या मालिकेमुळेही लोकप्रिय झाली होती. 'बिग बॉस मराठी'तही ती सहभागी झाली होती. मधली काही वर्ष जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. काही महिने तिला बेड रेस्टही सांगितल्याने ती घरीच होती. नंतर 'ठरलं तर मग' मधून तिने कमबॅक केलं. जुई ३७ वर्षांची आहे आणि लग्न करण्याची तिचीही इच्छा आहे. योग्य जोडीदाराचीच ती वाट पाहत आहे. आता तिच्या या उत्तरावरुन तिला तो जोडीदार मिळाला आहे का असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेतालग्न