Join us

Video : ३७ वर्षांनंतर पुन्हा सीतेच्या रुपात दिसल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, चाहते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 15:58 IST

पौराणिक मालिका 'रामायण'मध्ये सीतेचा रोल करणाऱ्या दीपिका चिखलीया यांची चाहते आजही आठवण काढतात.

छोट्या पडद्यावर 'रामायण' (Ramayana) ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेतील कलाकारांना खरोखरच लोक राम आणि सीता समजायला लागले होते. मालिकेत अरुण गोविल (Arun Govil) यांनी राम आणि दीपिका चिखलिया (Deepika Chikhliya) यांनी सीतेची भूमिका साकारली होती. अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांची पूजा करत आहेत.  यावेळी त्यांनी जी साडी नेसली आहे ती खूप खास आहे. 1988 मध्ये त्यांनी एका एपिसोडसाठी जी साडी नेसली होती तीच साडी त्यांनी आज ३७ वर्षांनंतर पुन्हा नेसली आहे. अशा प्रकारे इतक्या वर्षांनंतर दीपिका चिखलिया पुन्हा एकदा सीतेच्या भूमिकेत दिसल्या आहेत.

पौराणिक मालिका 'रामायण'मध्ये सीतेचा रोल करणाऱ्या दीपिका चिखलीया यांची चाहते आजही आठवण काढतात. साध्या नारंगी रंगाच्या साडीत त्यांनी पोस्ट शेअर केली जी त्यांनी मालिकेत नेसली होती. त्या पुन्हा सीतेच्या लुकमध्ये शोभून दिसत आहेत. चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ बघून मालिकेवेळेसच्या काळाची आठवण झाली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'पार्ट ३ फायनल - शेअर करायचे होते. ही तीच साडी आहे जी मी लव कुश अध्यायाच्या वेळी नेसली होती. 

अभिनेत्री दीपिकाने याआधीही अनेकदा रामायण चे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर केले होते. तेव्हाही चाहते असेच भावूक होतात. यावेळी त्यांनी सीतेच्या रुपात पाहून पुन्हा चाहत्यांना मालिकेची आठवण झाली आहे. 

टॅग्स :रामायणटिव्ही कलाकारसोशल मीडिया