Join us

मुंबईत राहणं परवडेना, घटस्फोटानंतर लेकीला घेऊन बिकानेरला शिफ्ट झाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:23 IST

अभिनेत्री बिकानेरमध्ये ऑनलाईन कपडे विक्री करते, म्हणाली...

मुंबईत भाड्याच्या घरात राहायचं म्हटलं तरी चिक्कार पैसे मोजावे लागतात. अगदी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटीही मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. सेलिब्रिटींना ऐसपैस घर हवं असल्याने ते दीड-दोन लाखही भाडंही भरतात. मात्र नुकतंच एका टीव्ही अभिनेत्रीने भाडं परवडत नाही म्हणून मुंबई सोडली आणि ती लेकीला घेऊन थेट बिकानेरला शिफ्ट झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa). चारुने सुष्मिता सेनच्या भावाशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगीही झाली जिचं नाव जियाना आहे. काही वर्षांनंतर चारुचा घटस्फोट झाला. आता नुकतीच चारु जियानाला घेऊन बिकानेरला शिफ्ट झाली आहे. तिथे ती ऑनलाईन कपडे विक्रीचा बिझनेस करत आहे. चारुचा कपडे विकतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला ज्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चारु आर्थिक संकटात असल्याचा अंदाज अनेकांनी लावला.

हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टला दिलेल्या मुलाखतीत चारुने ही बातमी कन्फर्म केली आहे. ती म्हणाली, "मी माझ्या गावी बिकानेरला आले आहे. मी मुंबई सोडली आहे आणि आईबाबांसोबत राहत आहे. जियाना आणि मी एक महिन्यापूर्वीच इथे आलो आहोत."

ती पुढे म्हणाली,"मुंबई राहणं सोपं नाही. खूप पैसे लागतात. मला महिन्याला एक ते दीड लाख रुपये खर्च यायचा. जेव्हा मी नायगावला शूटिंग करत होते तेव्हा जियानाला एकटीला नॅनीसोबत सोडू शकत नव्हते. हे फारच कठीण होतं. बिकानेरला येऊन स्वत:चं काम सुरु करायचं हे मी प्लॅन केलं होतं. हा घाईघाईत घेतलेला निर्णय नाही."

"जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन व्यवसाय सुरु करता तेव्हा संघर्ष करावाच लागतो. मी तरी कुठे वेगळी आहे? ऑर्डर घेण्यापासून ते स्टॉक मागवणं, पोहोचवणं सगळं मीच करत आहे. या बिझनेसमुळे मला माझ्या मुलीकडेही लक्ष देणं शक्य होत आहे. तसंच चारुचे वडील कधीही बिकानेरला तिला भेटायला येऊ शकतात."

टॅग्स :टिव्ही कलाकारपरिवारमुंबईबीकानेर