Ankita Lokhande Video: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ओळखली जाते. वेगवेगळे टीव्ही शो तसेच चित्रपटांमधून काम करुन तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आजही ती चाहत्यांमध्ये पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेतील अंकिता या नावाने प्रसिद्ध आहे. दरम्यान, अंकिता तिच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या डान्सचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिची सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे.
सध्या अंकिता लोखंडे तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत कुटुंबियांसमवेत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करते आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता मेरे रंग में रंगने वाली या सुपरहिट गाण्यावर डान्स करता दिसते आहे. साल १९८९ मध्ये आलेल्या सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांच्या 'मैने प्यार किया' सिनेमातील हे गाणं आहे. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील तिच्या या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अंकिता लोखंडेचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच चाहत्यांनी अंकिताच्या डान्ससह तिच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलं आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून त्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.