Join us

VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:02 IST

अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

Ankita Lokhande: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडेकडे (Ankita Lokhande) पाहिलं जातं. झी टीव्हीवरील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय अंकिताने काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे. अंकिता लोखंडे कधी व्यावसायिक तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते. नुकताच महाशिवरात्री निमित्ताने अंकिताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. महाशिवरात्रीच्या दिवशी अंकिता आपल्या राहत्या घरी महादेवाची मनोभावे पूजा करताना दिसते आहे .अंकिताच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर महाशिवरात्रीच्या औचित्य साधून हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. "महाशिवरात्रीच्या शुभेच्छा...! या पवित्र दिवशी परमेश्वराची कृपा तुमच्यावर कायम राहो. शिवाय प्रत्येकाच्या आयुष्यात सुखं आणि शांती लाभो..., ॐ नमः शिवाय!! अशी पोस्ट तिने लिहिली आहे. अभिनेत्रीचा हा भक्तीभाव पाहून व्हिडीओवर चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेत्री ‘कलर्स टीव्ही’वरील ‘लाफ्टर शेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अलिकडेच अंकिता लोखंडे 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुनाबाई यांच्या भूमिकेत दिसली होती. 

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकारसोशल मीडियामहाशिवरात्री