Join us

किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:34 IST

किडनी फेल नाही? सतीश शाह यांच्या निधनाचं कारण समोर

'साराभाई वर्सेस साराभाई' या विनोदी मालिकेतील अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना आणि त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. 'साराभाई वर्सेस साराभाई'मध्ये त्यांनी इंद्रवर्धन साराभाई ही भूमिका साकारली होती.  मालिकेत रत्ना पाठक त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत होती तर अभिनेता राजेश कुमार आणि सुमीत राघवन मुलांच्या भूमिकेत होते. रुपाली गांगुली सून होती. सतीश शाह यांना खऱ्या आयुष्यात मूलबाळ नव्हते. त्यांच्या अंत्यसंस्काराला राजेश कुमार, सुमीत राघवन आणि रुपाली गांगुली हजर होते. आता राजेश कुमारने सतीश शाह यांच्या निधनाचं खरं कारण सांगितलं आहे.

किडनी फेलमुळे सतीश शाह यांचं निधन झालं अशी बातमी सगळीकडे आली होती. मात्र आता अभिनेता राजेश कुमारने यावर उत्तर दिलं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सतीश शाह म्हणाले, "सतीशजींची तब्येत बरी होती. त्यांनी किडनीसंबंधी आजार होते पण त्यावर त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. ते दुपारचं जेवण करत होते. यानंतर काही वेळाने त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते कोसळले."

तो पुढे म्हणाला, "हे खूपच दु:खद आहे. पण लोकांना सत्य माहित असलं पाहिजे. किडनी फेल्युअर नाही तर हृदयविकाराच्या धक्क्याने सतीशजींचं निधन झालं आहे."

२५ ऑक्टोबर रोजी सतीश शाह यांनी जगाचा निरोप घेतला. इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांचे मित्र अंत्यसंस्काराला आले होते. यानंतर सतीश शाह यांच्यासाठी प्रार्थना सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं. सोनू निगमने यावेळी हजेरी लावली होती. सतीश शाह यांच्या पत्नीचं नाव मधु शाह आहे. त्यांना अल्झायमर असल्याने त्यांचीही प्रकृती नाजूक असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satish Shah's death: Rajesh Kumar reveals the real reason.

Web Summary : Satish Shah, of 'Sarabhai vs Sarabhai' fame, passed away due to cardiac arrest, not kidney failure, clarified Rajesh Kumar. He collapsed after experiencing chest pain. The actor's funeral was attended by colleagues.
टॅग्स :सतिश शहाटिव्ही कलाकार