Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हास्यजत्रे'तील लोकप्रिय अभिनेत्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार खास भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:34 IST

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एक अभिनेता आता झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत झळकणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडीचा शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एक अभिनेता आता झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत झळकणार आहे. नुकत्याच या मालिकेचा इव्हेंट पार पडला. त्यावेळी हा कलाकार spot झाला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे या अभिनेत्याने काहीच दिवसांपूर्वी लग्न केलं.  हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे निमिष कुलकर्णी.निमिषची नवी मालिकाकाल झी मराठीवरील आगामी 'सनई चौघडे' मालिकेचा इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये निमिष कुलकर्णी दिसला. गळ्यात टाय आणि शर्ट - पॅन्ट अशा खास कपड्यांमध्ये निमिषची झलक दिसली. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो केल्यानंतर आता 'सनई चौघडे' मालिकेतून निमिष खास भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निमिषची ही नवी मालिका पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतील यात काहीच शंका नाही. निमिष या मालिकेत दिसताच अनेक कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा निमिष कुलकर्णीने डिसेंबर २०२५ मध्ये लग्न करत त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. निमिषच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. निमिषने कोमल भास्कर हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. निमिषची पत्नी कोमलचंही कलाविश्वाशी खास कनेक्शन आहे. कोमल मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. ती मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते. एकूणच 'सनई चौघडे' मालिकेत निमिष नेमकी कोणती भूमिका साकारणार हे मालिका सुरु झाल्यावर कळेलच. १६ मार्चपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका तुम्हाला झी मराठीवर बघता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Haस्यजत्रे actor Nimesh Kulkarni enters Zee Marathi's 'Sanai Choughade'.

Web Summary : Nimesh Kulkarni, famed from 'Maharashtrachi Hasyajatra,' joins Zee Marathi's 'Sanai Choughade' after recently marrying Komal Bhaskar. Kulkarni's role remains a mystery, fans eagerly anticipate his performance in the series premiering March 16th at 8:30 PM.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राझी मराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसेलिब्रिटी