Join us

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा करतोय लग्न; दोन वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट, Ex पत्नीने केलेले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:40 IST

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा लग्न करतोय. अभिनेत्याची एक्स पत्नी सुद्धा अभिनेत्री होती. तिने घटस्फोट घेतल्यावर अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते

दोन वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट झाला होता. त्याच्या एक्स पत्तीने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. हा अभिनेता आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्याचं नाव आहे नंदिश संधू. 'उतरन' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या नंदीशने अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो एका मुलीसोबत एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोंमुळे नंदीशने साखरपुडा केला असून तो दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

नंदिशचा साखरपुड्याचा फोटो व्हायरल

नंदीश संधूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो एका सुंदर महिलेसोबत दिसत असून, दोघांनीही आपल्या हातातील एंगेजमेंट रिंग कॅमेऱ्यासमोर दाखवली आहे. नंदीशने या फोटोंना 'हाय पार्टनर' असं कॅप्शन दिलं आहे.

नंदीशने या फोटोमध्ये आपल्या होणाऱ्या बायकोचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही, पण त्यांच्या हातात असलेली अंगठी आणि 'पार्टनर' हा उल्लेख पाहता, त्याने आपल्या आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात केल्याचं मानलं जात आहे. नंदीशच्या या पोस्टवर चाहते आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

रश्मी देसाईसोबतचे लग्न आणि घटस्फोट

नंदीश संधू हा टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचा माजी पती आहे. 'उतरन' या लोकप्रिय मालिकेत काम करत असताना या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती आणि २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांची ही जोडी फार काळ टिकली नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतरच त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर रश्मी देसाईने एका मुलाखतीत नंदीशच्या लाइफस्टाइलवर आणि मुलींशी असलेल्या मैत्रीबद्दल गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे बरीच खळबळ माजली होती. सध्या नंदीश आणि रश्मी दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघाले आहेत. रश्मी देसाई टीव्ही आणि रिअॅलिटी शोमध्ये सक्रिय आहे, तर नंदीश संधू काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसला आहे. आता नंदीशने शेअर केलेल्या या फोटोंमुळे तो पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Nandish Sandhu to Marry Again After Divorce, Accusations

Web Summary : Actor Nandish Sandhu, known from 'Uttaran', is set to remarry after a divorce two years prior. His engagement photos are circulating online. Previously married to Rashami Desai, their divorce involved serious accusations. Both have moved on, with Sandhu now entering a new chapter.
टॅग्स :रश्मी देसाईलग्नटेलिव्हिजनटिव्ही कलाकार