टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्याने अभिनय सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे या कारणाने हा अभिनेता आता मनोरंजन विश्व सोडून अभिनय क्षेत्रातून कायमचा ब्रेक घेणार, असंही बोललं जातंय. हा अभिनेता आहे करण वाही. करणने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनय क्षेत्रातील निवृत्तीच्या चर्चांवर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर त्याच्या एका मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढला गेल्यामुळे या अफवा पसरल्या होत्या, असं तो म्हणाला.
एका इंस्टाग्राम पेजने करणच्या मुलाखतीची क्लिप शेअर करत असा दावा केला होता की, त्याने अध्यात्मासाठी अभिनय सोडला आहे. यावर प्रतिक्रिया देताना करणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "आध्यात्मिक असण्याचा अर्थ असा नाही की मला माझे काम सोडावे लागेल. कृपया फक्त व्हायरल होण्यासाठी अशा अफवा पसरवू नका. ज्याने कोणी ही पोस्ट केलीये त्या व्यक्तीला माझी विनंती आहे की त्याने ही पोस्ट काढून टाकावी आणि खोटे पसरवू नये."
अलीकडेच पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये करणने आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. करण आता नियमितपणे नामस्मरण करतो. त्याने वृंदावनहून आणलेली तुळशीची माळ परिधान करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याने पूर्णपणे मांसाहार सोडला आहे. आपल्यात झालेल्या या बदलाचे श्रेय करणने नीम करोली बाबा आणि प्रेमानंद महाराज यांना दिले आहे.
तो म्हणाला, "मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की मी शाकाहारी बनेन, पण आता माळ घातल्यानंतर सर्व काही खूप शांत आणि सकारात्मक वाटतंय." करण वाही आणि जेनिफर विंगेट यांच्या लग्नाच्या चर्चांनाही त्याने पूर्णविराम दिला आहे. जरी या दोघांची मैत्री खूप वर्षांपासून असली आणि त्यांनी अनेक शोजमध्ये एकत्र काम केले असले, तरी त्यांच्यात कोणतेही रोमँटिक नाते नाही. करणने स्पष्ट केले की, जेनिफर त्याची फक्त एक उत्तम मैत्रीण आहे.
करणला 'रिमिक्स', 'दिल मिल गए' आणि 'बात हमारी पक्की है' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली. अभिनयासोबतच 'झलक दिखला जा' सारख्या रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करून त्याने विशेष ओळख निर्माण केली आहे. सध्या तो ओटीटी प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे.
Web Summary : Actor Karan Wahi addressed rumors he quit acting for spirituality after a misinterpreted interview clip went viral. Wahi clarified that being spiritual doesn't mean leaving his work. He has adopted vegetarianism and prayer, crediting Neem Karoli Baba and Premanand Maharaj for the changes. He also denied marriage rumors with Jennifer Winget.
Web Summary : करण वाही ने उन अफवाहों का खंडन किया जिनमें कहा गया था कि उन्होंने अध्यात्म के लिए अभिनय छोड़ दिया है। उन्होंने स्पष्ट किया कि आध्यात्मिक होने का मतलब काम छोड़ना नहीं है। उन्होंने नीम करोली बाबा और प्रेमानंद महाराज को बदलाव का श्रेय देते हुए शाकाहार और प्रार्थना को अपनाया है। उन्होंने जेनिफर विंगेट के साथ शादी की अफवाहों का भी खंडन किया।