'मोहब्बते लुटाऊंगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेला मराठमोळा गायक म्हणजे अभिजीत सावंत. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये अभिजीत (abhijeet sawant) सहभागी झाला होता. या पर्वात अभिजीतने फानयलपर्यंत मजल मारली होती. अशातच अभिजीतने एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलाय त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलंय. लग्नानंतर अभिजीतने टिंडर या डेटिंग अॅपवर अकाऊंट उघडलं होतं. काय म्हणाला अभिजीत? जाणून घ्या
अभिजीतने बायकोला कळू न देता उघडलं टिंडर अकाऊंट
अभिजीतने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. अभिजीत म्हणाला की, "मी नवीन गोष्टी शोधणारा माणूस आहे. मला कायम नवीन गोष्टींबद्दल कुतुहल असतं. मी माझ्या मित्रासोबत अमेरिकेत होतो. त्यावेळी मित्राने या डेटिंग अॅपबद्दल मला सांगितलं. मी सुद्धा माझी प्रोफाईल बनवली. मी कधीकधी ते अॅप उघडून त्यात नक्की काय आहे, ते बघायचो. मी माझंच नाव प्रोफाईलला ठेवलं होतं. याविषयी बायकोला काही माहित नव्हतं. परंतु मी कोणालाही भेटलो नाही, काही केलं नाही."
अभिजीत पुढे म्हणाला, "टिंडरवर ज्या मुली भेटल्या त्यांच्याशी खूप बोलायचो. मॅच येत असल्याने मी त्या मुलींशी गप्पा मारायचो. ही खूप विचित्र गोष्ट होती. मला गप्पा मारायची आवड असून तुम्ही मुलींशी खूप सखोल संभाषण करु शकता. २-३ मुली टिंडरवर भेटल्या त्यांच्याशी चांगलं चॅटिंग झालं. ट्विटरवरही माझं अकाऊंट आहे. पण नंतर मनात विचार आला की, हे बरोबर नाही. बायकोलाही याविषयी काही माहित नव्हतं. परंतु आता तिला कळेल." अशाप्रकारे अभिजीतने प्रामाणिक कबूली दिली. अभिजीतचं २००७ मध्ये शिल्पासोबत लग्न झालं असून त्यांना दोन मुली आहेत.