Join us

'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 18:58 IST

आई कुठे काय करते: आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली निर्माते, दिग्दर्शकाची शाळा

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या आलेल्या ट्विस्टमुळे प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावर मालिकेला जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रोमोमध्ये आशुतोषचा मृत्यू होणार असल्याचं दाखवण्यात आलं. आता हा मृत्यू नेमका कसा होतो याचा एक प्रोमो आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कपाळालाच हात मारुन घेतलाय. इतक्या सहज कोणी मरतं का? असा प्रश्न कमेंट्समध्ये विचारला आहे. 

सध्या मालिकेत मनूसाठी आशुतोषची सुरु असलेली धडपड दाखवण्यात येत आहे. या कारणांमुळे बरेचदा अरुंधतीसोबत त्याचे खटकेही उडालेले असतात. माया आशुतोषला सांगते की मनूला ती दूर नेत आहे तेव्हा आशुतोष कासावीस होतो. दरम्यान रात्री अरुंधती आणि आशुतोष कारमधून जात असताना त्याला रस्त्यात मनू दिसते. आशुतोष घाईगडबडीत अरुंधतीला गाडी थांबवायला सांगतो तर अरुंधती त्याला सीटबेल्ट लावायला सांगते. पण तो ऐकत नाही आणि ब्रेक मारताच आशुतोष बाहेर पडतो. अशा प्रकारे त्याचा तिथे जागीच मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा प्रोमो सीरियल जत्रा इन्स्टाग्राम पेजवरुन व्हायरल होतोय.

प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी निर्मात्यांच्या लॉजिकवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ब्रेक लावताच आशुतोषचा दरवाचा उघडतो आणि तो बाहेर पडून मरतोही असं कसं होईल हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. 'निर्माता आणि दिग्दर्शक यांचा गुडघ्यात मेंदू आहे, एखादी नॉर्मल व्यक्ती इतकी मूर्ख नक्कीच असू शकत नाही की वेग असणाऱ्या चालत्या गाडीचा दरवाजा उघडेल.' अशी कमेंट एकाने केली आहे. 'एवढ्या सहज कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा मरेल, निदान ट्रक येतोय असं तरी दाखवायचं' अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेवर प्रेक्षक प्रचंड नाराज झालेत. त्यात असे ट्वि्स्ट पाहून तर त्यांचा संताप होतोय. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून मालिका टीआरपी चार्टमध्येही घसरली आहे. याच कारणाने मालिकेचा संध्याकाळचा प्राईम टाईमही काढून घेण्यात आला असून आता दुपारी प्रक्षेपित केली जात आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरसोशल मीडियाट्रोलटिव्ही कलाकार