Join us  

आई कुठे काय करते: हसमुख देशमुखला पाहिलं का? अभिषेकने शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 5:12 PM

Abhishek deshmukh: प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफचे फोटो शेअर करणाऱ्या अभिषेकने यावेळी त्याचे काही हटके फोटो शेअर केले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना आपलासा वाटतो. त्यामुळेच त्यांच्या जीवनातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिषेक सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्येच त्याने काही फोटो शेअर करत एका नव्या व्यक्तीची ओळख करुन दिली आहे.

या मालिकेत अभिनेता अभिषेक देशमुख, यशची भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये अभिषेकने एका प्रेमळ,थोडासा मस्तीखोर पण तितकाच आईवर प्रेम करणाऱ्या मुलाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अभिषेक खऱ्या आयुष्यातही तसाच आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफचे फोटो शेअर करणाऱ्या अभिषेकने यावेळी त्याचे काही हटके फोटो शेअर केले आहे. विशेष म्हणजे या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, अभिषेकने शेअर केलेल्या फोटोला त्याने 'हसमुख देशमुख', असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये अभिषेक दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. त्यामुळे या फोटोतील नवा व्यक्ती म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द अभिषेकच आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार