Apurva Gore And Anshuman Joshi Mehendi Ceremony: मराठी कलाविश्वात सध्या कलाकरांच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळते आहे. नुकतंच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचं लग्न पार पाडलं, त्यानंतर तुझ्या सोबतीने फेम अभिनेत्री एतशा सांझगिरीने देखील निषाद भोईरसोबत लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. तर काही कलाकार येत्या काही दिवसांत बोहोल्यावर चढणार आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरे. सध्या अपूर्वाच्या घरी लग्नाची लगबग सुरु असून नुकताच अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.
अपूर्वा गोरे लवकरच शाळा फेम अभिनेता अंशुमन जोशीसोबत विवाहबद्ध होणार आहे. दरम्यान, अपूर्वा-अंशुमनचा घरी लग्ना पूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.मेहंदी सोहळ्यासाठी रुमानीने फिकट जांभळ्या रंगाचा अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता.नुकताच या जोडीचा मेहंदी सोहळा दिमाखात पार पडला असून, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मेहंदी सोहळ्यासाठी अपूर्वाने नारंगी रंगाचा अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तर अंशुमनने त्याला मॅचिंग असा लूक केलाय.अभिनेत्रीच्या हातावर रेखाटलेल्या मेहंदीच्या नाजूक डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.अपूर्वा आणि अंशुमनचे हे फोटो पाहून सेलिब्रिटींसह चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्कफ्रंट
अपूर्वा आणि अंशुमनच्या कामाबद्दल सांगायचं तर, अभिनेत्री अपूर्वा गोरे आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. शिवाय अलिकडेच ती शेवग्याच्या शेंगा नाटकामुळे चर्चेत होती.तर, अंशुमन जोशी शाळा या सिनेमासाठी आजही ओळखला जातो. २०१२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाळा सिनेमात अंशुमन केतकी माटेगावकरसोबत झळकला होता.
Web Summary : Apurva Gore and Anshuman Joshi are set to tie the knot! The pre-wedding celebrations have commenced with a vibrant Mehendi ceremony. Apurva looked radiant in an orange dress, while Anshuman complemented her in a matching outfit. The couple's photos are circulating widely on social media.
Web Summary : अपूर्वा गोरे और अंशुमन जोशी जल्द ही शादी के बंधन में बंधने वाले हैं! मेहंदी समारोह के साथ शादी की पूर्व-उत्सव शुरू हो गया है। नारंगी रंग की पोशाक में अपूर्वा बहुत खूबसूरत लग रही थीं, जबकि अंशुमन ने भी उसी रंग का पोशाक पहना था। जोड़े की तस्वीरें सोशल मीडिया पर वायरल हो रही हैं।