Join us

आई कुठे काय करते: 'या' लोकप्रिय अभिनेत्री मालिकेत होणार रिएन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:16 IST

Aai kuthe kay karte: आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. यामध्येच आता एका  जुन्या अभिनेत्रीची रिएन्ट्री होणार आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्याच्या घडीला कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन राहिलेली नाही. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी दररोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आतापर्यंत या मालिकेतून काही कलाकारांनी निरोप घेतला. तर, काही नव्या कलाकारांनी एन्ट्री केली. यामध्येच आता एका  जुन्या अभिनेत्रीची रिएन्ट्री होणार आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेतील जवळपास सगळेच कलाकार आणि ते साकारत असलेल्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना ठावूक आहे. यामध्येच मध्यंतरी या मालिकेतून अभिनेत्री राधिका देशपांडे हिने एक्झिट घेतली होती. मात्र, आता राधिका पुन्हा या मालिकेत रिएन्ट्री करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये राधिका पुन्हा मालिकेचा भाग झाल्याचं दिसून येत आहे.  या मालिकेत राधिकाने अरुंधतीच्या मैत्रिणीची देवकीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता देवकीच्या येण्यामुळे अरुंधतीला पुन्हा तिची मैत्रीण मिळणार आहे.

दरम्यान, मध्यंतरी राधिकाने तिच्या नव्या बिझनेसला सुरुवात केली आहे. याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. राधिका उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम लेखिका, दिग्दर्शिकादेखील आहे. तसंच 'आई कुठे काय करते'पूर्वी तिने 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमध्ये तेजश्री प्रधानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमधुराणी प्रभुलकर