Join us

शॉकिंग! अभिनेत्री Mahhi Vij ला भररस्त्यावर अज्ञात व्यक्तिनं दिली बलात्काराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 15:14 IST

Mahhi Vij : माहीसोबत काल 7 मे रोजी घटना घडली. तिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वाचा काय आहे प्रकरण

Mahhi Vij gets rape threats : अभिनेता जय भानुशालीची (Jay Bhanushali) पत्नी व अभिनेत्री माही विज (Mahhi Vij ) हिच्यासोबत अलीकडे एक धक्कादायक घटना घडली. माहीने शनिवारी रात्री उशिरा  ट्विट केलं. तिचं हे ट्विट पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. एका अज्ञात व्यक्तिनं माझ्या कारला धडक दिली. मला शिवीगाळ केली आणि बलात्काराची धमकी दिली, असा खुलासा या व्हिडीओद्वारे तिनं केला आहे.माहीसोबत काल 7 मे रोजी घटना घडली. तिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एका गाडीची नंबर प्लेट दिसते. या गाडीतील व्यक्तिने माहीला अश्लिल शिवीगाळ केली.

‘या माणसानं माझ्या कारला धडक दिली. शिव्या दिल्या आणि नंतर रेपची धमकी देऊ लागला. त्याची बायकोही आक्रमक झाली. मुंबई पोलिस, या माणसाला शोधण्यात माझी मदत करा, जो आपल्यासाठी धोकादायक आहे,’असं हा व्हिडीओ शेअर करताना माहीनं लिहिलं आहे. मुंबई पोलिसांनी माहीचा हा व्हिडीओ पाहताच तिला त्वरित उत्तर दिलं. ‘कृपया, तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवा,’असा सल्ला मुंबई पोलिसांनी दिला. यानंतर पुढच्या ट्विटमध्ये माहीनं वरळी पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केल्याचं सांगितलं.या प्रकरणाचा तपास कसा सुरु आहे पुढे नेमकं काय झालंय हे अजून समजलेलं नाहीय.

माही विज 2020 मध्ये ‘मुझसे शादी करोगे’मध्ये दिसली होती. 2019 मध्ये माहीने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मापासून माही अ‍ॅक्टिंगपासून दूर आहे.

टॅग्स :जय भानुशालीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार