Join us

"होळीच्या आधी दिवाळी..." टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट 

By सुजित शिर्के | Updated: March 10, 2025 09:17 IST

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याचा थरार काल रविवारी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर रंगला.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याचा थरार काल रविवारी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गड्यांनी पराभव करीत तिसन्यांदा विजेता करंडक उंचावला, रोहित शर्माच्या नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या या विजयावर मनोरंजनविश्वासह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी देखील आनंद व्यक्त करत संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयावर मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने सुद्धा खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. अभिजीत केळकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भारताच्या विजयाचा जल्लोष करत अवघ्या मोजक्या शब्दांत पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, टी इंडियाच्या या शानदार विजयानंतर अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलंय, "होळीच्या आधी दिवाळी..." शिवाय बॅकग्राउंडला त्याने चक दे इंडिया हे गाणं लावलं आहे. दरम्यान, अभिजीत केळकरच्या या पोस्ट चर्चेत आली आहे.

दरम्यान, अभिजीत केळकरसह अभिनेता प्रसाद ओक, श्रेयस तळपदे, सौरभ चौघुले, समीर परांजपे, सिद्धार्थ जाधव तसेच शिव ठाकरे या कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५टिव्ही कलाकारभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडसोशल मीडिया