Join us
Daily Top 2Weekly Top 5

tamannaah: '..म्हणून साऊथ सिनेमा जास्त चांगले'; बॉलिवूडच्या तुलनेत तमन्नाला वाटतं टॉलिवूड सरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 16:34 IST

Tamannaah bhatia: तमन्नाने बॉलिवूड आणि टॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिला जवळची इंडस्ट्री कोणती वाटते हे तिने यावेळी सांगितलं.

दाक्षिणात्य कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया (tamannaah bhatia). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवणाऱ्या तमन्नाने आता बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या तिची दोन्ही इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. यामध्येच तमन्नाने एका मुलाखतीमध्ये टॉलिवूड आणि बॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये कोणता फरक आहे ते सांगितलं.

अलिकडेच तमन्नाने एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमात हजेरी लावली होती.यावेळी बोलत असताना तिने इंडस्ट्रीमधील तिचा अनुभव शेअर केला.

"बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काय फरक जाणवतो? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर, नॉर्थ आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये दोन्ही ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतील. ज्यात काही ऑर्गेनाइज्ड आहेत. आणि, काही डिसआर्गेनाइज्ड. साऊथचं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या देशातील तळागातील मुद्द्यांवर भाष्य करतात. त्यांच्यात माणुसकी असते. ते अचूकपणे सिनेमातून इमोशन्स व्यक्त करतात. तसंच ते चांगल्या स्टोरीही क्रिएट करतात. त्यामुळेच त्यांचे सिनेमा जास्त चांगले होतात," असं तमन्ना म्हणाली.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिने तिच्या नावाविषयी सुद्धा खुलासा केला. तिने तिच्या नावाची स्पेलिंग का बदलली यामागचं कारणदेखील सांगितलं.

टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडTollywoodसेलिब्रिटीसिनेमा