Join us

'पुरुषांसारखं चालतेस, थोडं...' दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन तमन्नाला मुलीसारखं राहण्याचं घ्यावं लागलं प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:55 IST

मला मुलींसारखं वागणं शिकावं लागलं.

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'जी करदा' वेब सिरीजमधील इंटिमेट दृश्य, 'लस्ट स्टोरीज २' मध्ये बोल्ड अंदाज आणि विजय वर्मासोबत रिलेशन यामुळे तिची सतत चर्चा होत असते. आजपर्यंत कधीही लिपलॉक सीन न करणाऱ्या तमन्नाने जी करदामध्ये आपलाच 'नो किसींग' पॉलिसीचा नियम तोडला. तमन्ना अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. पण तिची व्यक्तिमत्वावरुन अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकदा तर तिला तू पुरुषांसारखी चालतेस असं म्हणलं गेलं होतं.

तमन्नाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले, 'मला आठवतंय, एका निर्मात्याने मला सांगितलं की सिनेमात मला महिलेसारखंच चालणं, बोलणं, डान्स करणं, राग दाखवणं करायचं आहे. गंमत म्हणजे मला मुलींसारखं वागणं शिकावं लागलं. मला तर हेही सांगितलं गेलं की मुलीसारखं चालायचं आहे पुरुषासारखं नाही.'

ती पुढे म्हणाली, 'मी शाळेत गुंडी होते. एकदम टॉम बॉयसारखी राहायचे. मी भाईसारखी चालायचे थोडी मुलीसारखी चाल असंही मला लोक म्हणायचे. मी म्हटलं ठीक आहे पण मला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. शाळेत माझी इमेजच दादासारखी होते. एका समोस्यासाठीही मी भांडायचे. पण मला आधीपासूनच अभिनेत्री बनायचे होते. मी बर्फाळ भागात शिफॉन साडीत डान्स करत आहे अशी कल्पना करायचे. हेच माझं ध्येय होतं.'

'No Kissing' सीन म्हणणारी तमन्ना या कारणासाठी 'लस्ट स्टोरीज २'मध्ये इंटिमेट सीन्ससाठी झाली तयार

'मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हा मला मुलीसारखं राहणं फार अवघड जात होतं. शारिरीक थकवा येणारं होतं. मला पाठ, खांदे सरळ ठेवून चालायचं होतं या सगळ्याचं मला प्रशिक्षण मिळालं. खूप सराव केल्यानंतर मी सरळ पद्धतीने चालायला लागले', असंही ती म्हणाली.

टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडमहिला