Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेठालालच्या रिअल लाइफ सुनेला पाहिलंय का? जाणून घ्या, कोण आहे उन्नती गाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:46 IST

Dilip joshi: सध्या सोशल मीडियावर दिलीप जोशी यांच्या सुनेविषयी जाणून घेण्याचा चाहते प्रयत्न करत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आणि दिलीप जोशी (Dilip Joshi) हे जणू समीकरणच झालं आहे. दिलीप जोशींशिवाय ही मालिका अपूर्ण आहे. जेठालाल ही भूमिका साकारुन दिलीप जोशी विशेष प्रकाशझोतात आले. सोशल मीडियावरही त्यांचा तगडा फॅनफॉलोअर्स आहे. कलाविश्वात सक्रीय असलेल्या दिलीप जोशी यांच्या लेकाचं नुकतंच लग्न झालं. त्यामुळे त्यांची सून कोण ही चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

सोशल मीडिया आणि कलाविश्वामध्ये सक्रीय असलेले दिलीप जोशी त्यांच्या कुटुंबाविषयी फारसं कुठे व्यक्त होत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नाची बातमी चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. परंतु, त्यांच्या फॅनपेजवर या दोन्ही लग्नसोहळ्याचे फोटो तुफान व्हायरल झाले. या फोटो, व्हिडीओमुळेच जेठालालच्या घरी दोन नव्या पाहुण्याचं स्वागत झाल्याचं चाहत्यांना कळलं. दिलीप जोशी यांच्या लेकीच्या पाठोपाठ नुकतंच त्यांच्या लेकाचंही लग्न झालं.

दिलीप जोशींच्या लेकाने ऋत्विकने नुकतीच उन्नती गाला हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला तारक मेहताच्या सगळ्या टीमने हजेरी लावली होती. यात दयाबेन म्हणजेच दिशा वकानीदेखील आली होती.

कोण आहे दिलीप जोशींची सून

ऋत्विकने अभिनेत्री उन्नती गाला हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. उन्नती एक गुजराती अभिनेत्री आहे. तिला गुजराती नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. तर दिलीप जोशींचा लेक ऋत्विक सुद्धा अभिनेता आहे. त्याने धमाका सिनेमात काम केलं होतं.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकारदिशा वाकानी