Join us

पहिल्यांदाच दिसला दयाबेनचा बोल्ड अंदाज; दिशा वकानीचा जुना व्हिडीओ पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 16:51 IST

Disha vakani: सध्या सोशल मीडियावर दयाबेनचा म्हणजे दिशा वकानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय  कार्यक्रम म्हणून 'तारक मेहता का उल्टा चश्मा'कडे (taarak mehta ka ooltah chashmah ) पाहिलं जातं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, दयाबेनने विशेष लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानी (disha vakani) हिने साकारली असून गेल्या काही वर्षांपासून ती मालिकेतून गायब आहे. मात्र, तरीदेखील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. सध्या दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ती यात बोल्ड अंदाजात दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर दयाबेनचा म्हणजे दिशा वकानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात दिसत असून हा तिचा सुरुवातीच्या काळातील व्हिडीओ असल्याचं दिसून येत आहे. परंतु, तिचा हा व्हिडीओ पाहून काहींनी तिला ट्रोलदेखील केलं आहे.

दिशाला चाहत्यांनी कायम साडी वा ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये पाहिलं आहे. परंतु, या व्हिडीओमध्ये दिशाने स्कर्ट आणि बिकिनी टॉप परिधान केला आहे. त्यामुळे चाहते थक्क झाले आहेत.  म्हणूनच, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, दिशाचा हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना फारसा रुचलेला नाही. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. दिशाने २०१७ मध्ये तारक मेहतामधून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून चाहते तिची या मालिकेत येण्याची वाट पाहत आहेत. मात्र, दिशा काही कारणास्तव या मालिकेत पुन्हा येण्यास नकार देत असल्याचं सांगण्यात येतं 

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन