Join us
Daily Top 2Weekly Top 5

'घरच्या बिकट परिस्थितीमुळे मी अभिनेत्री झाले'; अंजली भाभीने सांगितल्या स्ट्रगल काळातील आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:48 IST

Sunina fauzdar:काही दिवसांपूर्वीच सुनैना मुजुमदारची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. सुनैना या मालिकेत तारक मेहताच्या पत्नीची अंजलीची भूमिका साकारत आहेत.

गेल्या १३-१४ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. आतापर्यंत या मालिकेत अनेक चढउतार आले. मात्र, मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कोणताही खंड पडू दिला नाही. या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले. काही जण ही मालिका सोडून गेले. परंतु, प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सुनैना फौजदार. या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या सुनैनाचा हा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी तिने बरेच हालाखीचे दिवस काढले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुनैना मुजुमदारची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. सुनैना या मालिकेत तारक मेहताच्या पत्नीची अंजलीची भूमिका साकारत आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत सुनैनाने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"मी लहानपणापासून या कलाविश्वात काम करतीये. मी माझ्या करिअरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. अनेक जाहिरातींमध्येही मी झळकले होते. त्याकाळी आमची परिस्थिती बेताची होती. माझ्या आईने आणि बहिणीने मला लहानाचं मोठं केलं.  त्यामुळेच त्यांना आर्थिक मदत म्हणून मी लहान वयातच काम करायला सुरुवात केली", असं सुनैना म्हणते.

पुढे ती म्हणते, "कॉलेजमध्ये असताना मी मॉडेलिंग केलं. काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर मी हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. खरं सांगू मला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण, त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती आणि  त्यामुळे घरात आर्थिक मदत करता यावी यासाठी मला ही वाट धरावी लागली. पण, हळूहळू यातच माझं करिअर घडू लागलं. म्हणूनच, आज माझ्या आयुष्यात फक्त अभिनयच आहे."

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारटेलिव्हिजन