Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल बेचारा 2? सुशांतसिंह राजपूतच्या शेवटच्या सिनेमाचा सीक्वेल येणार, चाहते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:03 IST

सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर हा सिनेमा रिलीज झाला होता. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushantsingh Rajput) शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'चा (Dil Bechara) सीक्वल येणार आहे. दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी ट्वीट करत 'दिल बेचारा 2' असे लिहिले. त्यामुळे सिनेमाचा सीक्वल येणार अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली. तसंच चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चाही सुरु झाली. 2020  साली सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. सिनेमात अभिनेत्री संजना सांघीने सुशांतसोबत स्क्रीन शेअर केली होती. सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर हा सिनेमा रिलीज झाला होता. 

दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी ट्वीट वर लिहिले,'दिल बेचारा 2'. यामध्ये त्यांनी कास्ट, रिलीज डेट, स्टोरी याविषयी काहीही लिहिलेले नाही. यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. 'दिल बेचारा 2' मध्ये कोणता अभिनेता असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. तसंच सुशांतचे चाहते भावूकही झाले. तर काही जणांना मात्र सीक्वलची आणायची गरज काय असा प्रश्नही पडला आहे. 

'दिल बेचारा' सिनेमा हॉटस्टारवर रिलीज झाला तेव्हा ते क्रॅश झालं होतं. इतक्या संख्येने युझर्सने सिनेमा बघितला. अशी माहिती फिल्ममेकर हंसल मेहताने दिली होती. imdb ने सिनेमाला 9.8 स्टार दिले. तसंच सिनेमाच्या ट्रेलरनेही रेकॉर्ड रचला होता. ट्रेलरला २४ तासात २४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. हॉलिवूडची फिल्म 'एवेंजर एंडगेम'च्याही ट्रेलरला मागे टाकले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूडसिनेमा