Join us

अभिजीत सावंतच्या लोकप्रिय गाण्यावर सूरज चव्हाणने केलं reel, चाहत्याची भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:04 IST

सूरजच्या या रीलला दोन तासातच १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) गाजला तो सूरज चव्हाणमुळे (Suraj Chavan). बारामतीतील एका छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने त्याच्या साधेपणामुळे सर्वांचं मन जिंकलं. सूरजनंतर अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) सर्वांचा लाडका होता. दोघंही टॉप २ पर्यंत पोहोचले आणि शेवटी सूरजने बाजी मारत ट्रॉफी नावावर केली. आता बिग बॉस संपल्यानंतर नुकतंच सूरजने अभिजीतच्या लोकप्रिय गाण्यावर रील केलं आहे. 

बिग बॉस संपून काही दिवस झाले आहेत. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागला आहे. सूरजनेही पुन्हा रील्स करायला सुरुवात केली आहे. आधी त्याने त्याचं 'बुक्कीत टेंगुळ' स्पेशल रील पोस्ट केलं. तर नंतर त्याने अभिजीत सावंतचं लोकप्रिय गाणं 'मोहोब्बते लुटाऊँगा'वर रील केलं. निळा शर्ट, जीन्स, कडक हेअरस्टाईल असा सूरजचा लूक दिसत आहे.' कितना सुहाना सा ये अपना सफर है...' गाण्यावर त्याने रील शेअर केलं आहे. या रीलला २ तासातच १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सूरजच्या या रीलवर एका चाहत्याने मजेशीर कमेंट करत लिहिले, 'अभिलाषाची आठवण येतेय का?'. बिग बॉसच्या घरात अभिजीतने अभिलाषा हे पात्र करत सर्वांचं मनोरंजन केलं होतं. यावरुनच चाहत्याने सूरजची चेष्टा केली. 

सूरज चव्हाण आता महाराष्ट्रात लोकप्रिय झाला आहे. बिग बॉसमुळे त्याचं नशीबच फळफळलं आहे. आधी 'राजा राणी' सिनेमात तो झळकला. तर आता केदार शिंदेंच्या 'झापूक झुपूक' सिनेमातही तो मुख्य भूमिकेत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंतसोशल मीडियासेलिब्रिटी