Join us
Daily Top 2Weekly Top 5

WHAT? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला डेट करतोय विकी कौशलचा भाऊ सनी कौशल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:28 IST

बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह...!! विकी कौशल कतरिना कैफच्या प्रेमात आहे. कौशल कुटुंबाचा धाकटा मुलगा सनी कौशल हा सुद्धा मागे नाही...

ठळक मुद्देशर्वरीने यापूर्वी ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. 

कौशल कुटुंबाचा थोरला मुलगा विकी कौशल कतरिना कैफच्या प्रेमात आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. विकी व कॅटच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. पण कौशल कुटुंबाचा धाकटा मुलगा सनी कौशल (Sunny Kaushal) हा सुद्धा मागे नाही. होय,  भावाप्रमाणेच त्याच्या अफेअरची सुद्धा जोरदार चर्चा आहे. मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हिच्यासोबत सनीचं नाव जोडलं जातंय. ही शर्वरी कोण तर महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची नात. (Is Sunny Kaushal Dating Sharvari Wagh)

शर्वरी व सनी यांनी ‘द फॉरगॉटन आर्मी’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं म्हटलं जातंय.  या दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडे शर्वरी ‘शिद्दत’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली. सनीसोबत तिनं मस्तपैकी पोझ दिल्या आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चेला आणखी बळ मिळालं.शर्वरी ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे, हे आम्ही आधीच सांगितलंय. ते कोण तर  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. 

होय, शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि आई आर्किटेक्ट आहे.शर्वरीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजमधून तिचा अ‍ॅक्टिंग डेब्यू झाला. शर्वरी लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘बंटी और बबली’च्या सीक्वलमध्ये ती मुख्य भूमिका दिसणार आहे. 

शर्वरीने यापूर्वी ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.  विकीचा भाऊ सनी कौशलबद्दल सांगायचं तर त्यानेही सुरूवातीला अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. यानंतर 2010 मध्ये ‘सनशाइन म्युझिक टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल’मधून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला.

टॅग्स :सनी कौशलबॉलिवूडविकी कौशल