Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी देओलला 'रामायण' युनिव्हर्सच्या पुढच्या सिनेमाचीही मिळाली ऑफर, काय आहे मेकर्सचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:19 IST

सनी देओलला आणखी एका पौराणिक सिनेमाची ऑफर आली आहे.

अभिनेता सनी देओल सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर आहे. २०२३ साली त्याच्या 'गदर २' सिनेमाने बॉलिवूडमध्ये वादळच आणलं. पुन्हा सनी देओलची जादू सगळीकडे पसरली. यानंतर त्याच्याकडे एकापेक्षा एक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. त्याचा 'बॉर्डर २' लवकरच रिलीज होत आहे. तसंच बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमात तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता सनी देओलच्या हाती आणखी एक सिनेमा लागला आहे ज्यात तो पुन्हा हनुमानाचीच भूमिका साकारणार आहे.

सनी देओलला आणखी एका पौराणिक सिनेमाची ऑफर आली आहे. 'रामायण'चेच निर्माते नमित मल्होत्रा भगवान हनुमानावर एक म्युझिकल फिल्म घेऊन येण्याच्या विचारात आहेत. या सिनेमासाठी सनी देओल मेकर्सची पहिली पसंती आहे. या भूमिकेसाठी सनीपेक्षा आणखी कोणीही चांगला अभिनेता असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा सिनेमा अॅक्शनपट असणार आहे आणि याला पौराणिक-पॉप ओपेराचा टच देण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हनुमानावर आधारित म्युझिकल सिनेमा हा रामायण यूनिव्हर्सचा दुसरा सर्वात मोठा सिनेमा असणार आहे. 'रामायण'मध्ये सनी देओलचे सुरुवातीचे काही सीन्स पाहिल्यानंतर लगेचच टीमला हे जाणवलं की या भूमिकेसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म हवा. तेव्हाच सनी देओलचंच नाव सतत समोर येत होतं. कारण त्याच्याहून चांगली ही भूमिका कोणीच करु शकाही नाही. तसंच तो ओरिजनल 'रामायण'चाही भाग आहे.

मेकर्स पौराणिक कथा, संगीत, दमदार अॅक्शन सीन्स, हवाई युद्ध, नृत्यकला आणि १२ मिनिटांचं वॉर साँगसोबत शानदार परफॉर्मन्स देण्याच्या विचारात आहे. या कथा अॅव्हेंजर्सप्रमाणेच एकमेकांशी जोडलेल्या असतील. कॅरेक्टर्स क्रॉसओव्हर होतील. सगळं सुरळीत झालं तर पुढील वर्षाच्या शेवटी या सिनेमावर काम सुरु होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunny Deol Offered Another Hanuman Role in 'Ramayana' Universe.

Web Summary : Riding high after 'Gadar 2,' Sunny Deol may play Hanuman again. Makers plan a musical film based on Hanuman, potentially a large 'Ramayana' universe installment, featuring action, music, and interconnected stories.
टॅग्स :सनी देओलबॉलिवूडहनुमान