Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत सनी अन् बॉबी देओल भावुक, हेमा मालिनींची गैरहजेरी, समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:07 IST

धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा मुंबईत पार पाडली. या सभेत हेमा मालिनींची गैरहजेरी सर्वांच्या नजरेत आली. त्यामागचं कारणही समोर आलंय

बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि कोट्यवधींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी (२७ नोव्हेंबर) मुंबईतील बांद्रा येथील ताज लँड्स एंड येथे देओल कुुटुंबाने प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात केले होते. या प्रार्थना सभेत हेमा मालिनींची गैरहजेरी सर्वांच्या नजरेत आली.

बॉलिवूडकरांची गर्दी

धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला करण जोहर, शाहरुख खान, सलमान खान, रेखा, महिमा चौधरी आणि माधुरी दीक्षितसह अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासूनअनेक कलाकार आणि त्यांचे धर्मेंद्र यांचे निकटवर्तीय देओल कुटुंबाला भेटून त्यांना धीर देत आहेत. या सभेदरम्यान गायक सोनू निगम यांनी धर्मेंद्र यांची गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सनी आणि बॉबी देओलकडून आभार

प्रार्थना सभेतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये धर्मेंद्र यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल हे हात जोडून लोकांना अभिवादन करताना दिसत आहेत. या कठीण काळात कुटुंबासोबत उभे राहिल्याबद्दल त्यांनी सर्व चाहत्यांचे आणि सिनेसृष्टीतील मित्रांचे आभार मानले.

हेमा मालिनी आणि मुलींची अनुपस्थिती

या प्रार्थना सभेमध्ये एकीकडे संपूर्ण बॉलिवूड एकत्र आले असताना, दुसरीकडे धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली, ईशा आणि आहना देओल  या अनुपस्थित होत्या. त्यांच्या गैरहजेरीमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले होते. NDTV ने दिलेल्या रिपोर्टनुसार, हेमा मालिनींना या प्रार्थना सभेसाठी देओल कुटुंबाकडून बोलवण्यात आलं नव्हतं, असं सांगण्यात येतंय. दरम्यान काही कलाकारांनी हेमा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra's prayer meet: Emotional Sunny, Bobby; Hema Malini absent.

Web Summary : Dharmendra's prayer meet saw Bollywood stars like Shah Rukh and Salman Khan pay respects. Sons Sunny and Bobby Deol expressed gratitude. Hema Malini and her daughters were absent, reportedly uninvited by the Deol family.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीसनी देओलबॉबी देओलबॉलिवूड