Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनील ग्रोव्हरला लागली मोठी लॉटरी, बॉलिवूडमध्ये अच्छे दिन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 15:46 IST

काही दिवसांपूर्वीच विशाल भारद्वाज यांच्या छुरीया सिनेमात त्याला भूमिका मिळाली होती. त्यानंतर आता त्याला आणखी एक मोठा सिनेमा मिळाला आहे.

मुंबई : कपिल शर्मासोबत वाद झाल्याने काही वेळ इंटस्ट्रीपासून लांब गेलेल्या सुनील ग्रोव्हरला मोठी लॉटरी लागली आहे. सुनील शर्माचे अच्छे दिन सुरु झाले, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच विशाल भारद्वाज यांच्या 'छुरीया' सिनेमात त्याला भूमिका मिळाली होती. त्यानंतर आता त्याला आणखी एक मोठा सिनेमा मिळाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'भारत' सिनेमात सुनील ग्रोव्हरला महत्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. या सिनेमात सुनील हा सलमान खानच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. पण ही केवळ कॉमेडी भूमिका नाहीतर महत्वपूर्ण भूमिका मानली जात आहे. 

याआधी सुनील ग्रोव्हरने गजनी सिनेमात अभिनेत्री असिनच्या मित्राची भूमिका साकारली होती. कपिल शर्माच्या शोमधून वेगळा झाल्यानंतर सुनील ग्रोव्हरने नुकतंच त्याच्या 'धन धना धन' या टीव्ही शोमधून रिएन्ट्री केली आहे. 

दरम्यान, भारत सिनेमात प्रियंका चोप्राला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्यात आली आहे. आता सुनीलकडेही दोन मोठ्या बॅनरचे आणि मोठ्या कलाकारांचे सिनेमे मिळाल्याने त्याच्याकडे आपलं करिअर सेट करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

टॅग्स :सुनील ग्रोव्हरबॉलिवूड