Join us  

अक्षया नाईकची नवी झेप; हॉटेलनंतर आणखी एका नव्या व्यवसायात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 1:14 PM

Akshaya naik: अभिनयासह अक्षया नवनवीन व्यवसायांमध्ये पदार्पण करत आहे.

मराठी कलाविश्वातली गोड आणि तितकीच उत्तम अभिनयक्षमता असलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या अक्षयाने काही दिवसांपूर्वीच हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता तिने पुन्हा एका नव्या व्यवसायात उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षयाने तिच्या नव्या बिझनेसविषयी सांगितलं आहे.

अक्षया मुळची गोव्याची आहे. त्यामुळे तिच्या मायभूमीमध्ये तिने नवा व्यवसाय सुरु केला ईगे. अक्षयाने तिच्या बहिणीच्या साथीने गोव्यात पर्यटकांच्या राहण्याची सोय केली आहे. नुकतंच अक्षयाने तिच्या या होम स्टेविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.पणजीपासून ८ किलोमीटर अंतरावर अक्षयाचं घर आहे. याच घराचं रुपांतर आता तिने होम स्टेमध्ये केलं आहे. या होम स्टेला अक्षयाने 'नाईक होम स्टे' असं नाव दिलं आहे.  

“गोव्यातलं आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं आहे. रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन तुम्ही येथे निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आमच्या नाईक होम स्टेमध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर दूर आणि करमाळी रेल्वे स्थानकापासून फक्त ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या घरात स्वागत करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतेय…”, असं कॅप्शन देत अक्षयाने तिच्या होम स्टेचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, अक्षयाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.सुंदरा मनामध्ये भरलीनंतर ती चूकभूल द्यावी घ्यावी या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अक्षयापूर्वी प्रार्थना बेहेरे, अभिज्ञा भावे,निरंजन कुलकर्णी आणि अनघा अतुल यांनी नव्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आहे. 

टॅग्स :अक्षया नाईकटेलिव्हिजनसेलिब्रिटीगोवा