लग्नानंतर चार महिन्यांतच दाक्षिनात्य सुपरस्टार नयनतारा आई झाली आहे. नयनताराच्या घरी जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे. अॅक्ट्रेसचा पती विग्नेश शिवनने मुलांसोबतचे आपले फोटोज शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. शिवनने अपले आणि पत्नी नयनताराचे बाळांसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. यात ते दोन्ही मुलांच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहेत. शिवनने हे फोटो शेअर केल्यानंतर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महत्वाचे म्हणजे नयनतारा आणि शिवन यांनी त्यांच्या बाळांना सरोगसीद्वारे जन्म दिला आहे.
विग्नेश दिली गुडन्यूज - आपल्या दोन्ही मुलांच्या पायांचे चुंबन घेताना नयनतारा आणि विग्नेश शिवन अत्यंत आनंदी दिसत आहेत. फोटोज शेअर करताना विग्नेशने लिहिले आहे, की 'नयन आणि मी आज अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळी मुलं झाली आहेत. आमच्या सर्व प्रार्थना आणि आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला दोन्ही मुलांच्या रुपात मिळाले आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वादही आम्हाला हवे आहेत. उईर आणि उलगम.'
साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून ओखळली जाणाऱ्या नयनतारा (Nayanthara ) 9 जून रोजी लग्नबंधनात अडकली होती. साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) तिने लग्नगाठ बांधली. महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. नयनतारा व विग्नेश गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
नयनतारानं लग्नात नवऱ्याला दिलं 20 कोटींचं खास गिफ्ट -नयनतारानं लग्नामध्ये विग्नेशला 20 कोटी रूपयांचा एक बंगला गिफ्ट म्हणून दिला. या बंगल्याची कागदपत्र तिने आधीच तयार करून घेतले होते. लग्नाच्या दिवशी नयनताराने हा बंगला पतीला गिफ्ट दिला. इतकेच नाही तर नयनताराने आपल्या नणंदेलाही 24 तोळे सोनेचा देगिने भेट दिले होते. याशिवाय, विग्नेशनेही पत्नी नयनताराला 5 कोटी रूपयांची डायमंड रिंग भेट दिली होती. लग्नाच्या दिवशी तिने ती घातली होती.