तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंजू कृष्णा हिला चेन्नईमध्ये अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडे अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडले आहेत. या अटकेच्या बातमीने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. रिपोर्टनुसार, अँटी-नार्कोटिक्स इंटेलिजन्स युनिटच्या (ANIU) साऊथ टीमने वलसरवक्कम भागात छापा टाकला. यावेळी अंजू कृष्णासह इतर लोकांना अटक करण्यात आली. टीमने मेथामफेटामाइन आणि गांजासारखे प्रतिबंधित पदार्थ जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अंजू कृष्णा, असिस्टेंट डायरेक्टर विन्सी निवेधा, कार्तिक राजा, यशवंत, श्रीराम, अल्विबिनशा आणि व्यंकटेश कुमार यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात ६ ग्रॅम मेथामफेटामाइन, ७ ग्रॅम ओजी गांजा, १५ ग्रॅम भांग, एक एलएसडी (LSD) स्टॅम्प आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
अंजू कृष्णाची फिल्मी कारकीर्द
या प्रकरणात नाव येण्यापूर्वी अंजू कृष्णाला तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील अभिनयासाठी ओळखले जात होते. ३१ वर्षीय अंजूने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. IMDb नुसार, तिने 'आकाशम कडन्न', 'आरो' आणि 'ओम वेल्लिमालई' सारख्या चित्रपटांत अभिनय केला. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला 'ओम वेल्लिमालई' हा चित्रपट ओम विजय यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये सुपरगुड सुब्रमणी आणि वीरा सुभाष मुख्य भूमिकेत होते.
२३.६ हजार फॉलोअर्स
अंजू कृष्णा सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २३.६ हजार फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे तिचं मॉडेलिंग वर्क, फोटोशूट आणि पर्सनल फोटो पोस्ट करत असते. तिच्या पोस्टमध्ये फॅशन, ग्लॅमर आणि फिल्मी घडामोडी पाहायला मिळतात.
अंजू कृष्णाच्या अटकेबाबत चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक तिला दोषी ठरवत आहेत, तर काही जण कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहण्याचा सल्ला देत आहेत. ANI युनिटचे अधिकारी सध्या तपास करत असून अटक केलेल्या सर्वांची चौकशी सुरू आहे. अंजू कृष्णाच्या अटकेमुळे चित्रपटसृष्टीतील ड्रग्जशी संबंधित चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
Web Summary : Tamil and Malayalam actress Anju Krishna and six others were arrested in Chennai for drug possession. Authorities seized meth, ganja, and LSD. The arrest has sent shockwaves through the film industry. Krishna has acted in films like 'Aakasam Kadanna'.
Web Summary : तमिल और मलयालम अभिनेत्री अंजू कृष्णा और छह अन्य को चेन्नई में ड्रग्स रखने के आरोप में गिरफ्तार किया गया। अधिकारियों ने मेथ, गांजा और एलएसडी जब्त किया। गिरफ्तारी से फिल्म उद्योग में सनसनी फैल गई है। कृष्णा ने 'आकाशम कडन्ना' जैसी फिल्मों में अभिनय किया है।