Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजय-मृणालच्या 'फॅमिली स्टार'चा भन्नाट टिझर भेटीला, या मराठमोळ्या अभिनेत्रीची खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:49 IST

विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या आगामी फॅमिली स्टार सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खास भूमिकेने वेधलं सर्वांचं लक्ष

विजय देवराकोंडा हा साऊथचा सुपरस्टार. 'गीता गोविंदम्' असो की 'डिअर कॉम्रेड' विजयने त्याच्या सिनेमांमधून कायमच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलंय. विजयचा बॉलिवूड पदार्पणाचा 'लायगर' सिनेमा फ्लॉप ठरला. त्यामुळे विजयच्या आगामी सिनेमाकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच विजयच्या आगामी सिनेमाचा धम्माल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाचं नाव आहे 'फॅमिली स्टार'. 'फॅमिली स्टार'मध्ये विजय अन् मृणाल ठाकूरची जोडी दिसतेय.

'फॅमिली स्टार' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. या टिझरमध्ये विजय कुटुंबाची काळजी घेणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा दिसतो. तो सर्वांसाठी जेवण करतो, पूजा करतो, ऑफीसला जातो. पण हाच विजय गुंडांशी सुद्धा दोन हात करतो. टिझरच्या शेवटी विजय आणि मृणालमधलं क्यूट संभाषण दिसतं. अल्पावधीतच  'फॅमिली स्टार' टिझरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

'फॅमिली स्टार' सिनेमाची खासियत अशी की, विजयसोबत त्याची आजी म्हणून मराठमोळी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी दिसतात. रोहिणी - विजय यांची खास केमिस्ट्री टिझरमध्ये बघायला मिळते. परशुराम यांनी सिनेमाच्या लेखन - दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. ५ एप्रिलला हा सिनेमा जगभरात रिलीज केला जाणार आहे. विजयला अॅक्शन तसंच विनोदी अंदाजात बघायला त्याचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील.

टॅग्स :विजय देवरकोंडामृणाल ठाकूरTollywood