Join us

रजनीकांत यांच्या 'जेलर २'मध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, मिथून चक्रवर्तीच्या लेकीच्या भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:38 IST

या सिनेमातून अभिनेत्री तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या २०२३ साली आलेल्या 'जेलर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सिनेमातले ट्विस्ट तर अनपेक्षित होते. रजनीकांत यांचा अभिनय आणि अॅक्शन सीन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आता सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. विशेष म्हणजे 'जेलर २'मध्ये टॅलेंटेड अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. या सिनेमातून विद्या तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे.

हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, 'जेलर २'मध्ये विद्या बालनला कास्ट करण्यात आले आहे. या सिनेमातून ती तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सिनेमाची अर्ध्याहून जास्त शूटिंगही झालं आहे. विद्या या सिनेमात मिथून चक्रवर्ती यांच्या थोरल्या लेकीच्या भूमिकेत आहे. तर मिथून चक्रवर्ती सिनेमात खलनायकाचं पात्र साकारणार आहेत. म्हणजेच 'जेलर २'मध्ये रजनीकांत आणि मिथून यांची टक्कर पाहायला मिळणार आहे.

सूत्रांनी पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाचं शूट चेन्नईत सुरु आहे.चेन्नई शेड्युल संपल्यानंतर टीम ऑक्टोबर शेवटी दोन महिन्यांसाठी गोव्यात शूट करणार आहे.  जानेवारीपर्यंत सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु होईल. नेल्सन दिलीपकुमार सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात रजनीकांत, मिथून चक्रवर्ती, विद्या बालन यांच्याशिवाय एस.जे.सूर्या, राम्या कृ्ष्णन, योगी बाबू आणि मिर्ना हे कलाकारही आहेत. रजनीकांत यांच्या सिनेमात विद्या बालनला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidya Balan joins Rajinikanth's 'Jailer 2' as Mithun's daughter.

Web Summary : Vidya Balan enters Tamil cinema with 'Jailer 2,' playing Mithun Chakraborty's daughter. Rajinikanth and Mithun will clash in the film, directed by Nelson Dilipkumar. Shooting is underway in Chennai and Goa; the movie also stars S.J. Surya and Ramya Krishnan.
टॅग्स :रजनीकांतविद्या बालनTollywood