साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आणि आता राजकारणात सक्रीय असलेला थलपती विजय सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी विजयची पत्नी संगीता सोनर्लिंगमने विजयविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची बातमी आली. तसंच त्यांनी विजयचे विवाहबाह्य संबंध आहेत असेही आरोप केले अशी चर्चा झाली. या चर्चा सुरु असतानाच काल एका रिसेप्शनला विजयने चर्चित गर्लफ्रेंड अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत हजेरी लावली. रिसेप्शनला एकत्र येत या दोघांनी नातं जवळपास कन्फर्मच केलं. आता त्रिशाने रिसेप्शनमध्ये केलेल्या लूकचे फोटो पोस्ट केले आहेत. यावर तिला hate कमेंट्स आल्या आहेत.
निर्माते कलपति सुरेश आणि मीनाक्षी सुरेश यांच्या मुलाचं काल रिसेप्शन झालं. या सोहळ्याला थलपति विजयची एन्ट्री झाली. मात्र त्याच्यासोबत त्रिशा कृष्णनला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कालपासून हा विषय तुफान चर्चेत आला आहे. त्रिशा आणि विजयने रिलेशनशिप कन्फर्म केलं अशा चर्चा सुरु झाल्या. रिसेप्शनसाठी त्रिशाने लाल बॉर्डर असेलली सोनेरी साडी परिधान केली होती. त्यावर लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. तिने हिरव्या रंगाची खास ज्वेलरी घातली होती. या लूकमधील फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
त्रिशाच्या या फोटोंवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांना मात्र तिचं विजयसोबत असणं पटलेलं नाही. त्यामुळे तिला निगेटिव्ह कमेंट्सही आल्या आहेत. 'प्लीज त्याला सोड','सिस्टर तू जे करतेय ते चुकीचं आहे','तुला कळत नाही का? एका कुटुंबात तू विष कालवलं आहेस' अशा नकारत्मक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
थलपति विजय आणि त्रिशाच्या नात्याची संपूर्ण पार्श्वभूमी
सुरुवातीची मैत्री आणि 'गिल्ली'चा काळ (२००४-२००५)
विजय आणि त्रिशा यांनी पहिल्यांदा 'गिल्ली' (Ghilli) या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, खऱ्या आयुष्यातही त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा तेव्हाच सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'थिरुपाची' आणि 'आधी' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करून ही जोडी हिट ठरवली.विजय आणि त्रिशा यांनी पहिल्यांदा 'गिल्ली' (Ghilli) या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, खऱ्या आयुष्यातही त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा तेव्हाच सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'थिरुपाची' आणि 'आधी' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करून ही जोडी हिट झाली.
१४ वर्षांचा दुरावा (२००९ - २०२३)२००८ मध्ये 'कुरुवी' चित्रपटानंतर, या जोडीने दीर्घकाळ एकत्र काम केले नाही. या काळात विजय आपल्या कौटुंबिक आयुष्यात व्यस्त होता, तर त्रिशा साऊथच्या इतर मोठ्या स्टार्ससोबत काम करत होती. अचानक त्यांनी एकत्र काम करणे बंद केल्यामुळे, त्यांच्यात काहीतरी वाद झाले असावेत किंवा त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे त्यांनी अंतर राखले असावे, असे म्हटले जात होते.
लिओ' (Leo) मधून पुनरागमन (२०२३)
लोकेश कनागराज यांच्या 'लिओ' चित्रपटात तब्बल १४ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्रिशाने विजयसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. एका फोटोला तिने "Chasing stars..." असे कॅप्शन दिले होते, ज्यामुळे जुन्या चर्चांना पुन्हा उधाण आले.
५. लंडन ट्रिप आणि अलीकडील चर्चा (२०२४-२५) नुकतेच विजय आणि त्रिशा लंडनमध्ये एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. जरी ते त्यांच्या आगामी 'GOAT' चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेले असल्याचा दावा केला गेला, तरीही सोशल मीडिया युजर्सनी ते गुपचूप एकत्र वेळ घालवत असल्याचे म्हटले.
Web Summary : Trisha Krishnan faced backlash after photos with Thalapathy Vijay at a reception fueled relationship rumors. Netizens criticized her for allegedly causing family discord following Vijay's divorce speculations.
Web Summary : रिसेप्शन में थलपति विजय के साथ तस्वीरों के बाद त्रिशा कृष्णन को आलोचना का सामना करना पड़ा, जिससे रिश्ते की अफवाहें तेज हो गईं। विजय के तलाक की अटकलों के बाद नेटिज़न्स ने उन पर पारिवारिक कलह पैदा करने का आरोप लगाया।