सध्या 'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. १९ मार्च २०२६ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग पुन्हा एकदा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. अशातच 'धुरंधर २' ला टक्कर द्यायला एका बड्या अभिनेत्याचा सिनेमा येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर येताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. KGF स्टार यशचा हा सिनेमा असून त्याचं नाव आहे 'टॉक्सिक'. विशेष म्हणजे 'धुरंधर २' ला न घाबरता 'टॉक्सिक' सुद्धा मार्चमध्ये रिलीज होतोय.
'टॉक्सिक'चं नवं पोस्टर
'टॉक्सिक' या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले असून, यात यशचा एक अत्यंत डार्क आणि आक्रमक अवतार पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये यशच्या हातात दारूची बाटली असून त्याचा हा 'रॉकिंग' लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. याशिवाय पोस्टरवर बर्फवृष्टी होत असून बर्फावर रक्त सांडलेलं दिसतंय. 'टॉक्सिक'चं पोस्टर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. KGF स्टार यशला पुन्हा एकदा अशा खलनायकी अंदाजात बघण्यास चाहते आतुर आहेत.
'टॉक्सिक' vs 'धुरंधर २'
'टॉक्सिक' हा चित्रपट गोवा येथील १९४० ते १९७० च्या दशकातील ड्रग माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत असून, यात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एकूणच बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची मोठी टक्कर रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' सोबत होणार आहे. आता यात कोण बाजी मारेल, हे मार्चमध्येच कळेल.
Web Summary : KGF star Yash's 'Toxic,' a big-budget film set against the backdrop of Goa's 1940-1970s drug mafia, is set to clash with Ranveer Singh's 'Dhurandhar 2' at the box office. The film releases March 19, 2026.
Web Summary : केजीएफ स्टार यश की 'टॉक्सिक', जो गोवा के 1940-1970 के दशक के ड्रग माफिया की पृष्ठभूमि पर आधारित एक बड़ी बजट की फिल्म है, बॉक्स ऑफिस पर रणवीर सिंह की 'धुरंधर 2' से टकराने के लिए तैयार है। फिल्म 19 मार्च, 2026 को रिलीज होगी।