Join us

चिंब भिजलेले रूप सजलेले, श्रीवल्लीच्या अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचा चुकला ठोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:18 IST

रश्मिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकानं सगळ्यांनाच वेड लावले आहे. जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे ती नॅशनल क्रश झाली आहे. साऊथ चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या 'पुष्पा 2'मुळे चर्चेत आहे. यातच आता रश्मिकानं चाहत्यांना पुन्हा वेड लावलं आहे.  रश्मिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रश्मिकाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अभिनेत्रीनं जागतिक पृथ्वी दिनी (२२ एप्रिल) एक खास व्हिडीओ शेअर केला. यामध्ये रश्मिका ही बधब्याखाली भिजताना पाहायला मिळत आहे. यात रश्मिका पांढऱ्या रंगाच्या टॉप आणि मल्टी कलर स्कर्टमध्ये दिसून येत आहे. धबधब्याखाली श्रीवल्लीच्या अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना जागतिक पृथ्वी दिनाच्या (२२ एप्रिली जागतिक पृथ्वी दिन )शुभेच्छा दिल्या. 

रश्मिका अलीकडेच संदीप रेड्डी वांगा यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'मध्ये दिसली होती. सध्या अभिनेत्री तिच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ८ एप्रिलला या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. 3 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनच्या डॅशिंग स्वॅग पाहण्यासारखा होता. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2' नंतर रश्मिका 'ॲनिमल पार्क'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानासेलिब्रिटीबॉलिवूडTollywood