Join us

प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा! घरी चिमुकल्याचं आगमन; कलाकार अन् चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:48 IST

लग्नाच्या दीड वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा! घरी चिमुकल्याचं आगमन, कलाकार अन् चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव 

Varun Tej: गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांनी गुडन्यूज दिल्या आहेत. तर काही कलाकार लवकर आनंदाची बातमी देणार आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मेगा प्रिंस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वरुण तेजने नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. २०२३ मध्ये वरुण तेजने लावण्या त्रिपाठीसोबत इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात  लग्न केलं होतं. त्यानंतर लग्नाच्या दीड वर्षांनी अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. 

नुकताच सोशल मीडियावर वरुण तेजने त्याची पत्नी आणि लेकासोबतचा छानसा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीला  पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर अभिनेत्याने पोस्ट शेअर करत म्हटलंय, "Our Little Man...", असं म्हणत त्याने मुलाच्या जन्माची तारीखही सांगितली आहे. मुलाच्या जन्मानंतर आता अभिनेत्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

वरुण तेज हा साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय आहे. तो प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागबाबू व पद्मजा कोनिडेला यांचा मुलगा आहे. 2023 मध्ये वरुण तेजन गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत शाही पद्धतीने लग्न केलं. वरुण आणि लावण्याच्या लग्नात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन, राम चरण वरुण-लावण्याच्या लग्नासाठी उपस्थित होते. वरुण हा चिरंजीवी यांचा भाचा आहे. तर अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्याबरोबरच त्याचे कौटुंबिक संबंध आहेत.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसोशल मीडिया