Thalapathy Vijay Father Reaction: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार, राजकारणी थलपती विजयला कोणत्याही परिचयाची गरज नाही. एकीकडे राजकारणातील त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज असताना दुसरीकडे त्याचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या २७ वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. अभिनेत्याच्या पत्नीने तमिळनाडूतील चेंगलपट्टू येथील जिल्हा न्यायलयात याचिका दाखल केली आहे. इतकंच नाहीतर विजयच्या पत्नीने त्याचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी जोर धरला असताना आता या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्याच्या वडील चित्रपट निर्माते दिग्दर्शक एस.ए.चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, संगीताने २४ फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू जिल्हा मुख्य न्यायालयात १२ पानी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, संगीताने पोटगी आणि चेन्नईतील नीलंकराई येथील घरात राहण्याच्या हक्कासह अनेक मागण्या केल्या आहेत.या वादावर विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर पहिल्यांदाच बोलले आहेत.काही लोक विजयची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय घटस्फोटाचं हे प्रकरण खूप पूर्वीच मिटलं होते, परंतु आता राजकीय अजेंड्याचा भाग म्हणून ते सार्वजनिक केले जात आहे. असे आरोप देखील त्यांनी केले आहेत. एका खाजगी यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याचे वडील म्हणाले,"काही लोक विजयला स्त्रीयांचा अनादर करतो किंवा तो कुटुंबियांच्या विरोधात आहे, अशा अफवा पसरवून त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. हा एक वैयक्तिक हल्ला आहे."
पुढे त्यांनी सांगितलं की,"हे प्रकरण खूप पूर्वीच मिटलं होतं आणि दोघांनी सामंजस्याने त्याच्यावर स्वाक्षरी केली होती. आता हे प्रकरण काही लोकांकडून उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे." असं त्यांनी सांगितलं.
थलपती विजयची पत्नी संगीता ही श्रीलंकन तमिळ आहे. विजयने २५ ऑगस्ट १९९९ रोजी संगीताशी लग्न केलं होतं. दोघांनीही आपलं खासगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पण आता लग्नाच्या २७ वर्षानंतर हे जोडप विभक्त होत आहे.
Web Summary : Thalapathy Vijay's divorce news involves his wife, Sangeeta, filing for divorce after 27 years, alleging an affair. His father, S.A. Chandrasekhar, claims the matter was settled long ago and is now being used politically to tarnish Vijay's image.
Web Summary : थलपति विजय के तलाक की खबर में उनकी पत्नी संगीता ने 27 साल बाद तलाक के लिए अर्जी दी है, जिसमें उन्होंने अफेयर का आरोप लगाया है। उनके पिता, एस.ए. चंद्रशेखर का दावा है कि मामला बहुत पहले सुलझा लिया गया था और अब विजय की छवि को राजनीतिक रूप से खराब करने के लिए इस्तेमाल किया जा रहा है।