Allu Arjun Upcoming Cinema: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन हा कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याचे सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी रोमान्स, अॅक्शन आणि थ्रिलरची पर्वणी असते. यापुर्वी अल्लु अर्जूनच्या पुष्पा आणि 'पु्ष्पा-२' या या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता नुकतीच अल्लु अर्जूनच्या आगामी सिनेमाची खास घोषणा झालीय. या सिनेमात त्याचा आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाज दिसणार यात शंका नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अभिनेत्याने चाहत्यांना हे अनोखं सरप्राईज दिलं आहे.
पुष्पा-२ च्या मोठ्या यशानंतर अल्लू अर्जूनने चित्रपट निर्माते लोकेश कनगराज यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.या कोलॅबरेशनमुळे सिनेसृष्टीत उत्सुकता वाढली असून चित्रपटाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'AA23' असं आहे. 'पुष्पा' फ्रँचायझीची निर्मिती करणाऱ्या मैत्री मूव्ही मेकर्स कंपनीने पोंगलच्या निमित्ताने एक ॲनिमेटेड टीझर प्रदर्शित केला आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर नव्या सिनेमाचा पहिला टीझर शेअर केला आहे. त्यामध्ये पाहायला मिळतंय की, सुरुवात एका सूर्योदयाच्या दृश्याने होते. ज्यामध्ये एक जंगल आणि तिथे अनेक प्राणी दिसत आहेत.अल्लू अर्जुन एका धगधगत्या आगीजवळ चालताना दिसतो. या घोषणेनंतर, अभिनेत्याचा आगामी चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे.मात्र,चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. २०२६ मध्येच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा अल्लू अर्जुनच्या अभिनय कारकिर्दीतील २३वा चित्रपट आहे. तर लोकेश कनगराज दिग्दर्शित करत असलेला हा सातवा सिनेमा आहे. सध्याअल्लू अर्जुन ॲटलीच्या चित्रपटावर काम करत आहे, ज्यात दीपिका पादुकोण देखील प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेता या प्रोजक्टकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Web Summary : After 'Pushpa-2' success, Allu Arjun collaborates with Lokesh Kanagaraj for 'AA23.' An animated teaser was released. Filming starts in 2026. He is also working on Atlee's film.
Web Summary : 'पुष्पा-2' की सफलता के बाद, अल्लू अर्जुन ने लोकेश कनगराज के साथ 'AA23' के लिए सहयोग किया। एक एनिमेटेड टीज़र जारी किया गया। फिल्म की शूटिंग 2026 में शुरू होगी। वह एटली की फिल्म पर भी काम कर रहे हैं।