They Call Him OG: गेल्या काही वर्षात ओटीटी माध्यमाचं महत्त्व खूप वाढलं आहे. सस्पेन्स, थ्रिलरसह रोमॅन्टिक चित्रपटांच्या चाहत्यांसाठी या माध्यमावर खूप कन्टेंट उपलब्ध आहे. अशाच एका चित्रपटाची ओटीटीवर चर्चा रंगली आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की शेवटपर्यंत तुमची स्क्रिनवकरून नजर हटणार नाही. बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा चित्रपट आता ओटीटी मार्केटवर राज्य करत आहे.५४ वर्षीय नायकाच्या या चित्रपटाने ओटीटीवरील टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे.
या चित्रपटाचं नाव 'दे कॉल हिम ओजी'. हा चित्रपट सुजीतने दिग्दर्शित केला आहे. हा एक गँगस्टर ॲक्शन ड्रामा आहे. ज्यामध्ये साऊथस्टार पवन कल्याणची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात ओजास गंभेरा, ज्याला OG म्हणून ओळखलं जातं, तो एका क्रूर गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या ओमी भाऊ (इमरान हाशमी) याच्याशी सामना करण्यासाठी परत येतो. अभिनेत्री प्रियांका आरुल मोहन, अर्जुन दास, श्रिया रेड्डी, प्रकाश राज आणि अभिमन्यू सिंग या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'दे कॉल हिम ओजी' २५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर महिनाभरातच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्याने या चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दमदार कथेमुळे हा सिनेमा आता ओटीटीवरही ट्रेंड होतोय.हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम तसेच हिंदी या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Web Summary : Pawan Kalyan's 'They Call Him OG,' a gangster action drama, is trending on OTT after a successful theatrical run. The film, directed by Sujeeth, features a 54-year-old actor and is available on Netflix in multiple languages.
Web Summary : पवन कल्याण की 'दे कॉल हिम ओजी', एक गैंगस्टर एक्शन ड्रामा, थिएटर में सफल प्रदर्शन के बाद ओटीटी पर ट्रेंड कर रही है। सुजीत द्वारा निर्देशित, फिल्म में 54 वर्षीय अभिनेता हैं और यह नेटफ्लिक्स पर कई भाषाओं में उपलब्ध है।