Join us
Daily Top 2Weekly Top 5

अत्यंत वाईट घटना! दिग्दर्शकाच्या ४ वर्षाच्या चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू, सिनेसृष्टीत हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:21 IST

केजीएफ चाप्टर २ चे सह दिग्दर्शक आणि इतर अनेक सिनेमांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या किर्तन नादगौडा यांच्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

सिनेसृष्टीतून एक वाईट आणि दु:खद बातमी समोर येत आहे. केजीएफ चाप्टर २ चे सह दिग्दर्शक आणि इतर अनेक सिनेमांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या किर्तन नादगौडा यांच्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. किर्तन यांच्या साडेचार वर्षांच्या चिरंजीवा सोनार्श या मुलाचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून किर्तन नादगौडा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी (१५ डिसेंबर) ही दुर्देवी घटना हैदराबाद येथे घडली. खेळता खेळता चिरंजीवी सोनार्श एकटाच लिफ्टमध्ये गेला. लिफ्टमध्ये अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. या दुर्देवी लिफ्ट अपघातात चिरंजीवी सोनार्श या चिमुकल्याने प्राण गमावले आहेत. या घटनेवर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार पवन कल्याण यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत म्हटलं आहे की "दिग्दर्शक कीर्तन नादगौडा यांच्या मुलाच्या अकाली निधनाची बातमी ऐकून प्रचंड धक्का बसला. कीर्तन आणि समृद्धी पटेल यांच्या कुटुंबावर ओढवलेला हा प्रसंग अत्यंत क्लेशदायक आहे. या कठीण काळातून सावरण्यासाठी देवानं त्यांना शक्ती द्यावी, हीच प्रार्थना".

English
हिंदी सारांश
Web Title : Director's 4-year-old son dies in lift accident; film industry mourns.

Web Summary : KGF Chapter 2 co-director Keerthan Nadagouda's four-year-old son died in a tragic lift accident in Hyderabad. The child got trapped and sustained fatal injuries. The film industry is in mourning, offering condolences to the bereaved family.
टॅग्स :Tollywoodमृत्यू