South Actress: हल्ली एखादा चित्रपट असो किंवा टीव्ही मालिका त्यामधील इंटिमेट सीन्स असणं ही सामान्य गोष्ट झाली आहे. बरेच कलाकार पडद्यावर असे सीन करण्यासाठी कंफर्टेबल नसतात. तर अनेकदा अशा इंटिमेट सीन्समुळे चित्रपट नाकारले जातात. अशातच आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने ९० च्या काळात हा सीन शूट करताना तिला कोणत्या अडचणी आल्या याबद्दलही या नायिकेने भाष्य केलं आहे.,या अभिनेत्रीचं नाव मोहिनी आहे.
अभिनेत्री मोहिनी हे तमिळ सिनेविश्वातील लोकप्रिय नाव आहे. निखळ सौंदर्य आणि सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रीने चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, दिग्दर्शक आर.के.सेलवमणि यांच्या कनमणी चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. चित्रपटातील एका गाण्यात तिने स्विमिंग पूलमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. त्यामुळे तिची सर्वाधिक चर्चा झाली. अशातच आता इतक्या वर्षानंतर अभिनेत्रीने ते सीन्स करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया देत मोहिनी म्हणाल्या, "दिग्दर्शक आर.के सेल्वमणी यांनी या स्विमसूटमधील त्या सीनची प्लॅनिंग केली होती. मला त्यामुळे खूप टेन्शन आलं होतं. मी रडलेही आणि तो सीन करण्यास नकार दिला, त्यामुळे अर्धा दिवस शूटिंग थांबवलं गेलं.मी त्यांनी हेही सांगितलं की मला पोहोयला येत नाही.शिवाय महिला प्रशिक्षक नसेल तर मी मग ते कसं करू? मात्र, त्यांनी मला तो सीन करण्याची जबरदस्ती केली."
त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं," मी अर्धा दिवस काम केलं आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तो सीन केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की, तोच सीन पुन्हा उटीमध्ये शूट करायचा आहे, तेव्हा मी नकार दिला. त्यावर ते म्हणाले की, मग पुढे शूटिंग करता येणार नाही. त्याचे ते शब्द ऐकून मी म्हणाले, मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तुम्ही आधीही मला जबरदस्तीने ते करायला लावलं होतं, अशा थेट शब्दांत मी त्यांना सांगितलं. कधी कधी काही गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध घडतात आणि हा सीन त्याचं एक उदाहरण होतं. कनमणी हा माझ्या करिअरमधील असा एक चित्रपट होता ज्यामधील सीन्स मला जबरदस्तीने करायला लावले होते."
मोहिनी यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीत अक्षय कुमारसह साऊथ बड्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.अक्षय कुमारसोबत त्या 'डान्सर'चित्रपटात झळकल्या आहेत. शिवाजी गणेशन, नंदमुरी बालकृष्ण, मोहनलाल, ममूटी या नायकांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. त्या शेवटच्या २०११ मध्ये आलेल्या 'कलेक्टर' चित्रपटात दिसल्या.