South Movie: कनी कुस्रुतीला (ऑल वी इमॅजिन ऍज लाईट, गर्ल्स विल बी गर्ल्स) जगभरातून IMDb वर विजिट करणा-या 25 कोटींहून अधिक मासिक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb 'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कार मिळणार आहे. वेगवेगळे चित्रपट, टीव्ही शो आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या 'IMDB'ने 'ऑल वी इमॅजिन ऍज लाईट' आणि 'गर्ल्स विल बी गर्ल्स' मधील अभिनेत्री कनी कुस्रुतीला IMDb'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचे घोषित केले आहे. IMDB अॅप वर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये सर्वाधिक उत्तम प्रदर्शन करणा-यांना ह्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. जगभरातून IMDB वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजद्वारे हे निर्धारित होते आणि हा पुरस्कार म्हणजे करीअरमध्ये कोणत्या अभिनेत्याचा मोठा ब्रेकथ्रूचा क्षण आला आहे, हे कळण्यासाठीचा हा अचूक मापदंड ठरला आहे.
कुस्रुतीने पायल कपाडियाच्या 'ऑल वी इमॅजिन ऍज लाईट'मध्ये प्रभा ह्या मुंबईत काम करणा-या मल्याळी नर्सची भुमिका केली आहे. या चित्रपटाने ग्रँड प्रिक्स जिंकून 2024 च्या 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये इतिहास रचला व यावेळी 1994 नंतर पहिल्यांदाच एका भारतीय चित्रपटाने मुख्य स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याला 82 व्या 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारांमध्येही दोन नामांकने मिळाली होती. या चित्रपटाच्या अलीकडे झालेल्या स्ट्रीमिंग रिलीजनंतर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये कुस्रुतीने महत्त्वाचे स्थान पटकावले. IMDb च्या ग्राहकांनी 'ऑल वी इमॅजिन ऍज लाईट'ला 7.2/10 रेटींग दिले आहे.
कुस्रुतीच्या अन्य उल्लेखनीय कामांमध्ये 'केरला कॅफे', 'बिर्यानी', 'ओके कंप्युटर', आणि 'गर्ल्स विल बी गर्ल्स' यांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 40 व्या स्वतंत्र स्पिरिट पुरस्कारांमध्ये 'गर्ल्स विल बी गर्ल्स'मधील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक भुमिकेसाठी नामांकन मिळालेले आहे. तसेच, 'ऑल वी इमॅजिन ऍज लाईट'ला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचरसाठी नामांकन मिळाले होते.
“IMDB 'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदाने मी भावुक झाली आहे. यावर प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली, "मला इतका आत्मविश्वास कधीच नव्हता. त्यामुळे जेव्हा अशी मान्यता मिळते, तेव्हा आपल्याला कळते की, आपण जे करतो ते बरोबर आहे,” कुस्रुतीने म्हंटले. “ज्या लोकांनी मला मदत केली, त्या माझ्या प्रेक्षकांना मला सांगावेसे वाटते की, मीसुद्धा तुमच्यासारखी एक प्रेक्षक आहे आणि मला वेगवेगळ्या गोष्टी बघून नेहमी शिकून माझे विचार आणखी पुढे न्यावेसे वाटतात. IMDB वर आपण वेगवेगळे कलाकार, अभिनेते, फिल्म्स ह्याबद्दल खूप काही शिकू शकतो व त्यातून आपल्याला खूप गोष्टी कळतात व नवीन संकल्पना मिळतात. हे गिफ्ट आपण स्वत:ला देऊ शकत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी बघा राहा, वेगवेगळ्या कलाकारांचे अभिनय बघत राहा- एखाद्या वेळेस आपल्याला आवडले नाही तरीही. त्यातून आपल्याला काही मिळेल."
आधीच्या IMDb 'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कारांमध्ये शर्वरी, नितांशी गोयल, मेधा शंकर, भुवन अरोरा, अंगीरा धर, आदर्श गूरे, एश्ले पार्क, एयो एडेबिरी आणि रेगे- जिआँ पेज ह्यांचा समावेश होतो.