Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळा शर्ट अन् लुंगी पकडून आला 'राजासाब', प्रभासच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:25 IST

ही एक रोमँटिक हॉरर फिल्म असणार असणार आहे.

'सालार' च्या यशानंतर प्रभासच्या (Prabhas) आगामी सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. 'राजासाब' या त्याच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. प्रभास पोस्टरमध्ये दिसत आहे. ही एक रोमँटिक हॉरर फिल्म असणार असणार आहे. मारुती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून ही पॅन इंडिया फिल्म असणार आहे. मारुती यांनी अनेक तेलुगू चित्रपट यशस्वीरित्या दिग्दर्शित केले आहेत.

प्रभासने शेअर केलेल्या 'राजासाब'च्या फर्स्ट लूकमध्ये तो टीशर्ट आणि लुंगी अशा अवतारात दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला फटाक्यांचा प्रकाश आहे. 'या सणासुदीच्या मुहुर्तावर राजासाबचा फर्स्ट लूक शेअर करत आहे. सर्वांना मकर संक्रांती आणि पोंगलच्या शुभेच्छा.'

फिल्मबद्दल दिग्दर्शक मारुती दसारी म्हणाले,'माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये ही सर्वात खास फिल्म आहे. एक फिल्म निर्माता म्हणून प्रभास आणि मीडिया फॅक्ट्रीसोबत काम करणं माझ्यासाठी सम्मान आणि रोमांचक अनुभव आहे. आम्ही प्रेक्षकांना एक भव्य हॉरर अनुभव देण्यासाठी तयार आहोत. प्रभास या सिनेमाचा भाग असणं हे जास्त स्पेशल आहे. या भीतीदायक सिनेमात प्रभासचा स्क्रीन प्रेझेन्स आणखी रोमांचित करणारा असेल.'  

प्रभास सध्या 'सालार' चे यश एन्जॉय करत आहे. 'साहो','राधेश्याम' आणि 'आदिपुरुष' हे तीनही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने 'सालार' ही ब्लॉकबस्टर हिट दिली. शिवाय त्याचा 'कल्कि 2989 एडी' रिलीज होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. १२ जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र आता मेकर्सने सिनेमा 9 मे 2024 साली रिलीज करण्याचं ठरवलं आहे. कमल हासन यामध्ये व्हिलनच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :प्रभाससिनेमाTollywood