बॉलिवूडचा सुलतान सलमान खान आणि साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या अनटाइटल्ड चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली असून, मुहूर्ताच्या पूजेसाठी सलमान खान आणि नयनतारा सेटवर पोहोचल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, निर्माते दिल राजू यांच्या या प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांना साऊथचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला सलमानचा 'सिकंदर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळेच यावेळी सलमानने आपल्या करिअरची सूत्रे पुन्हा एकदा साऊथच्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हाती दिली आहेत. वामशी पेडिपल्ली यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या या सिनेमाला तात्पुरते 'SVC 63' असे नाव देण्यात आले आहे, कारण दिग्दर्शक म्हणून वामशी यांच्या करिअरमधील हा ६३ वा चित्रपट आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान आणि नयनतारा शूटिंगच्या सेटवर दाखल होताना दिसत आहेत. ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच या चित्रपटाच्या टायटलचा आणि कथेचा उलगडा केला जाण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण आजपासून सुरू झाले असले तरी, हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. चित्रपटसृष्टीतील चर्चांनुसार, सलमान खान आणि नयनतारा यांचा हा हाय-व्होल्टेज ॲक्शन चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२७ च्या ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकतो.
Web Summary : Salman Khan and Nayanthara started shooting for their untitled film directed by Vamshi Paidipally. The film, tentatively titled 'SVC 63', is expected to release next year during Eid. This marks the first collaboration between Salman and Nayanthara.
Web Summary : सलमान खान और नयनतारा ने वामशी पेडिपल्ली द्वारा निर्देशित अपनी अनटाइटल्ड फिल्म की शूटिंग शुरू कर दी है। फिल्म, जिसका अस्थायी शीर्षक 'SVC 63' है, अगले साल ईद के दौरान रिलीज होने की उम्मीद है। यह सलमान और नयनतारा का पहला सहयोग है।